ETV Bharat / bharat

Leopard Killing : बिबट्यांची हत्या करून त्यांचे पंजे आणि हाडांची विक्री करताना 8 आरोपींना अटक - पंजे आणि हाडे विकण्याचा प्रयत्न

या दोन्ही गुन्ह्यांमध्ये सध्या 8 आरोपींना अटक करण्यात आली असून (8 arrested for killing leopards) वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. (killing leopards and selling their claws and bones).

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 4, 2022, 5:27 PM IST

हसन (कर्नाटक) : कर्नाटकातल्या हसन पोलिसांनी दोन वेगवेगळ्या प्रकरणात दोन बिबट्यांची हत्या करून त्यांचे पंजे आणि हाडे विकण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी 8 आरोपींना अटक केली आहे. (8 arrested for killing leopards). या दोन्ही घटना हसन जिल्ह्यातील बेलूर आणि अलूर वनक्षेत्रात घडल्या, अशी माहिती पोलिसांनी शनिवारी दिली. (killing leopards and selling their claws and bones).

पंजे आणि हाडांची विक्री करण्याचा प्रयत्न

पहिली घटना : हालेबिडू होबळी येथील कोमरनहल्ली येथे सुमारे 3 ते 4 वर्षे वयाची मादी बिबट्या गुरे पकडण्यासाठी आली असता तिला खाली लोटून ठार करण्यात आले. तिचे हाडे व पंजे विकण्याचा प्रयत्न करताना आरोपींना पकडण्यात आले. अटक करण्यात आलेले आरोही रवी, मोहन आणि स्वामी हे एटीएम सुरक्षा रक्षक आहेत, ज्यांनी विक्रीत मदत केली होती, असे हसनचे डीवायएसपी विजय भास्कर यांनी सांगितले. आरोपी रवी आणि मोहन यांनी बिबट्याला ठार करून पुरले होते. बिबट्याला मारल्यानंतर काय करावे हे न समजल्याने त्यांनी स्वामी नावाच्या एटीएम सुरक्षा रक्षकाची मदत घेतली. पंजे काढून मृतदेह कोमरनहळ्ळीजवळ पुरण्यात आला. नंतर त्याची काही हाडे आणि पंजे विकताना पोलिसांनी त्यांना पकडले. सुरक्षा रक्षकानेही विक्रीत मदत केली, असे डीवायएसपी म्हणाले.

दुसरी घटना : अलुरू वनपरिक्षेत्रातील माडीहल्ली गावात 7 ते 8 वर्षे वयोगटातील नर बिबट्याला ठार मारण्यात आले. पंजासाठी त्या बिबट्याचे चार पाय कापले गेले. मंजेगौडा, मोहन, कांतराजू रेणुका कुमार आणि कांताराजू यांना या प्रकरणी अटक करण्यात आली आहे. हसनजवळील देवरायपट्टणम बायपासजवळ बिबट्याचे चार पंजे आणि 18 पंजे विकताना या पाच आरोपींना अटक करण्यात आली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून बिबट्याचे पंजे आणि पाय जप्त करण्यात आले आहेत, असे डीवायएसपी विजय भास्कर यांनी सांगितले.

या दोन्ही गुन्ह्यांमध्ये सध्या 8 आरोपींना अटक करण्यात आली असून वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.