ETV Bharat / bharat

अफगाणिस्तानच्या बल्ख परिसरात हवाई हल्ला, सात तालिबानी दहशतवादी ठार - बल्ख परिसरात हवाई हल्ला

अफगाणिस्तानच्या चोमताल जिल्ह्यातील बल्ख परिसरात हवाई हल्ल्यात सात तालिबानी दहशतवादी मारले गेले.अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की हल्ल्यात शस्त्रे आणि दारूगोळा नष्ट करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी झालेल्या हवाई हल्ल्यात बल्ख प्रांताच्या चोमताल जिल्ह्यात सात तालिबानी ठार झाले.

Taliban terrorists killed in airstrike
बल्ख परिसरात हवाई हल्ला
author img

By

Published : Dec 26, 2020, 9:41 AM IST

बल्ख (अफगाणिस्तान) - अफगाणिस्तानच्या चोमताल जिल्ह्यातील बल्ख परिसरात हवाई हल्ल्यात सात तालिबानी दहशतवादी मारले गेले.अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे की हल्ल्यात शस्त्रे आणि दारूगोळा नष्ट करण्यात आला आहे. शनिवारी सकाळी झालेल्या हवाई हल्ल्यात बल्ख प्रांताच्या चोमताल जिल्ह्यात सात तालिबानी ठार झाले. याव्यतिरिक्त, पाच जण जखमी झाले, त्याच्याजवळील शस्त्रे आणि दारुगोळा मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात आले, असे असे संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.

बाला बोलोक जिल्ह्यातही हल्ला

मंत्रालयाने फराह प्रांताच्या बाला बोलोक जिल्ह्यात इतर आठ तालिबानी दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची देखील माहिती दिली. फराह प्रांताच्या बाला बोलोक जिल्ह्यात शुक्रवारी रात्री आठ तालिबानी दहशतवादी ठार झाले आणि तीन जण जखमी झाले. तसेच त्यांच्याजवळील शस्त्रे आणि दारुगोळा मोठ्या प्रमाणात नष्ट करण्यात आले.

पाकिस्तानला आवाहन
तालिबान नेत्यांच्या दहशतवादी कारवाया सतत सुरु आहेत. यानंतर पाकिस्तानमध्ये तालिबानी नेत्यांची उपस्थिती अफगाणिस्तानाच्या राष्ट्रीय सार्वभौमत्वाचे उल्लंघन करत असल्याचे अफगाणिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले आहे. तसेच अफगाणिस्तानने इस्लामाबादला देखील युद्ध व रक्तपात चालू ठेवण्याचा आग्रह धरणार्‍या बंडखोरांना प्रदेशात प्रवेश देऊ नये" असे आवाहन केले आहे.

नेत्यांची दहशतवादी कारवायांसाठी मदत

तालिबानी नेत्यांची पाकिस्तानात उपस्थिती असलेले व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांच्या पाकिस्तानातील दहशतवादी कारवाया देखील सुरु असल्याचे स्पष्ट होते, असे अधिकृतपणे सांगण्यात आले आहे. तालिबानी नेते दहशतवादी प्रशिक्षणाला भेट देत असल्याचे व्हिडिओच्या माध्यमातून उघड झाले. यावर मंत्रालयाने खंत व्यक्त केली आहे.

हेही वाचा - शोपियान जिल्ह्यात चकमक; एक अतिरेकी ठार तर दोन जवान जखमी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.