ETV Bharat / bharat

Liquor Party In Custody : कैद्यांची कोठडीत दारू पार्टी, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी केली कारवाई - बिहारमध्ये दारूबंदी

पालीगंज पोलिसांनी दारू पार्टी करणाऱ्या ७ कैद्यांना उत्पादन शुल्क विभागाच्या कोठडीतून अटक केली आहे. (Liquor party in custody of Excise Department). दारू पार्टीचा व्हिडिओ व्हायरल झाल्या नंतर ही कारवाई करण्यात आली. (Liquor party at police station in patna).

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 1, 2022, 9:22 PM IST

पाटणा : पाहायला गेलं तर बिहारमध्ये दारूबंदी लागू आहे. (Bihar Liquor Ban). पण या कायद्याची कशाप्रकारे खिल्ली उडवली जाते हे पाटण्याच्या पालीगंज येथील उत्पादन शुल्क विभागाच्या पोलीस ठाण्यात पाहायला मिळाले. (Liquor party at police station in patna). पाटणा येथील स्टेशन लॉकअपमध्ये पाच कैदी केवळ दारू पिताना पकडले गेले नाही तर तेथून दारूही जप्त करण्यात आली! (Liquor party at Patna Excise Department). या प्रकरणी ड्युटीवर असलेल्या 2 पोलिसांना अटक करण्यात आली आहे. (Liquor party in custody of Excise Department).

व्हायरल व्हिडिओनंतर पोलिसांची कारवाई

बिहारमधील लॉकअपमध्ये दारूची पार्टी : मंगळवारी दुपारी उत्पादन शुल्क विभागाने पाच जणांना पकडले. त्यानंतर त्यांना कोठडीत बंद केले. त्याच रात्री त्यांना लॉकअपमध्ये दारूसह सर्व आवश्यक गोष्टी पुरवल्या गेल्या. या पार्टीचा व्हिडिओ देखील बनवला होता. पार्टी केल्यानंतर यातील एकाने हा व्हिडीओ आपल्या कुटुंबीयांना पाठवला. मात्र हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर ही बातमी पाटण्याच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली.

बाहेरून दारू मागवली होती : पालीगंजचे एएसपी अवधेश दीक्षित यांनी गुरुवारी सांगितले की, हजतमधील कैद्यांचा दारू पिण्याचा व्हिडीओ कोणीतरी पोलिसांना पाठवला. त्या आधारे छापा टाकला असता, कैद्यांकडून देशी दारू आणि मोबाईल फोन जप्त करण्यात आले. या लोकांनी बाहेरून दारू मागवली होती आणि ती लॉकअपमध्येच प्यायली असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये बिक्रम कारसा रोड येथील कुंदन कुमार, बिक्रम येथील चंदन कुमार, दुल्हीन बाजार लाला भडसरा येथील शहेनशाह अन्सारी, अख्तरपूर येथील रामजी मांझी, मांझौली येथील संजय मांझी, कॉन्स्टेबल सियाराम मंडल आणि छोटे लाल मंडल यांचा समावेश आहे.

कोठडीत दारू कशी पोहोचली? : या संपूर्ण प्रकरणावर पालीगंजचे अतिरिक्त पोलीस अधीक्षक अवधेश दीक्षित यांनी सांगितले की, पोलिसांना सोशल मीडियावर व्हायरल झालेला एक व्हिडिओ सापडला आहे. या व्हिडिओमध्ये दारूबंदी विभागाच्या कोठडीत पाच कैदी दारू पीत असून पोलीस त्यांना साथ देत होते. झटपट कारवाई करत पोलिसांनी स्टेशनवर नाकाबंदी करून छापा टाकला. पोलिसांनी घटनास्थळावरून पाच कैदी आणि दोन हवालदारांना अटक केली आहे. एएसपीने सांगितले की, शहर पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला असून संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.