नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर असून कोरोनाने अनेकांचा बळी घेतला आहे. कोरोनाच्या या संकटात मोदी सरकारची कामगिरी कशी आहे, याचा सर्व्हे एबीपी न्यूज-सी व्होटरने केला आहे. यामध्ये 63.1 टक्के लोकांना असे वाटते की पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोना संकटाचा सामना सर्वोत्तम प्रकारे करीत आहेत. तर केवळ 22 टक्के लोकांचे मत आहे की काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोनास संकट अधिक चांगल्या प्रकारे हाताळले असते. या सर्वेमध्ये सहभागी झालेल्या काही प्रश्न विचारण्यात आले, त्यावर त्यांनी आपली मतं नोंदवली आहेत.
शहरी भागात 20.1 टक्के लोकांना असे वाटते की राहुल गांधी जर देशाचे पंतप्रधान असते तर कोरोनाचे संकट अधिक चांगल्या प्रकारे हाताळले असते, तर ग्रामीण भागातील 22.8 टक्के लोकांनीही हेच मत नोंदवले.
शहरी भागातील 65.8 टक्के लोकांचे मत आहे, की मोदींनी कोरोना संकटाचे काम सर्वोत्तम पद्धतीने केले आहे. तर ग्रामीण भागातील 61.9 टक्के लोकांनानीही हेच मत नोंदवले. तर 14.9 टक्के लोकांनी म्हटले, की ते या पैलूवर काहीही बोलू शकत नाहीत.
काँग्रेस नेते राहुल गांधींना पसंती नाही -
23 मे ते 27 मे दरम्यान देशभरातील लोकांवर सर्वेक्षण करण्यात आले. सर्वेक्षणात समोर आलेल्या निष्कर्षांनुसार, लोकांमध्ये सरकारविरोधात संताप दिसून येत असला तरी, लोक साथीच्या आजाराशी निगडीत राहण्यासाठी सतत केंद्र सरकारवर हल्ले करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधींना पसंत करत नाहीत.