गाजीपूर - मोहम्मदाबाद कोतवाली परिसरातील अहिरौली भागात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका ट्रकने 6 जणांना चिरडले आहे. यात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन जणांना रुग्णालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.
...आणि ट्रक थेट गप्पा मारत असलेल्या नागरिकांच्या अंगावर गेला -
जिल्ह्यातील मोहम्मदाबाद तहसीलच्या अहिरौली गावात सकाळी सकाळी भीषण अपघात झाला. सकाळी नागरिक हे रस्त्याच्या कडेला बसून गप्पा मारत होते. यावेळी भीषण अपघात झाला. रस्त्यावरून जाणाऱ्या एक ट्रकाचे चाक हे खड्ड्यात केले आणि त्या चालकाचे ट्रकवरील नियत्रंण सुटल्याने ट्रक थेट गप्पा मारत असलेल्या नागरिकांच्या अंगावर गेला. ट्रक हा सुमारे 50 मीटर पर्यंत त्या नागरिकांना चिरडत गेला होता.
अपघातात 6 जणांचा मृत्यू -
या घटनेत 10 पेक्षा अधिक लोक जखमी झाले आहे. तर या ट्रक अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला. तर दोन लोक गंभीर जखमी झाले होते. त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते रुग्णालयात पोहोचण्याच्या आत त्यांचा मृत्यू झाला.
गावकऱ्यांनी मृतदेहांना रस्त्यावर ठेऊन केला रस्ता रोको -
घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक हे संपूर्ण पथकासह घटनास्थळी दाखल झाले होते. यादरम्यान गावकऱ्यांनी मृतदेहांना रस्त्यावर ठेऊन रस्ता जाम केला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी केलेल्या नुकसान भरपाईसह अन्य मागण्या मान्य करण्याचे आश्वासन दिले. यावेळी लोकांना मृत्यांच्या नातेवाईकांना नोकरी देण्याची मागणी ही नागरिकांनी केली, यावर त्यांनी कोणतेही स्पष्ट उत्तर दिले नाही.
जिल्हाधिकाऱ्यांनी एनएचआईने बनवलेल्या रस्त्याची केली पाहणी -
नागरिकांच्या सांगण्यावरून जिल्हाधिकाऱ्यांनी एनएचआईने बनवलेल्या रस्त्याची पाहणी केली. यावेळी रस्ता हा निकृष्ट दर्जाचा बनलेला आहे असे निदर्शनास आले. त्यावेळी त्यांनी एनएचएआईच्या अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. आणि याप्रकरणी अधिकारी आणि ठेकेदार यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
हेही वाचा - वोकल फॉर लोकल : 400 वर्षे पूर्वीची फटाके बनवण्याच्या पद्धतीचे पुनरुज्जीवन