ETV Bharat / bharat

Road Accident in Jodhpur : ट्रक-बोलेरोचा अपघात; एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू

author img

By

Published : Apr 15, 2022, 8:45 AM IST

Updated : Apr 15, 2022, 8:52 AM IST

जोधपूरमध्ये गुरुवारी (दि. 14 एप्रिल)रोजी रात्री उशिरा झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात तीन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर येथील मथुरादास माथूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (Road Accident in Jodhpur ) चुरू येथील रहिवासी असलेले हे कुटुंब नागना कुल देवीच्या दर्शनासाठी जात होते. त्यावेली हा अपघात घडला.

अपघात झालेली कार
अपघात झालेली कार

मुंबई - जोधपूरमध्ये गुरुवारी (दि. 14 एप्रिल)रोजी रात्री उशिरा झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. (Six members killed a accident in Jodhpur) या अपघातात तीन जण जखमी झाले असून, त्यांच्यावर येथील मथुरादास माथूर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. चुरू येथील रहिवासी असलेले हे कुटुंब नागना कुल देवीच्या दर्शनासाठी जात होते. (same family die in an accident in Jodhpur) त्यावेली हा अपघात घडला.

नागना कुल देवीच्या दर्शनासाठी जात होते - जोधपूर-जयपूर राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू झाला आहे. यात तीन जण जखमी झाल्याचीही माहिती समोर आली आहे. जखमींना मथुरादास माथूर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या उपचाराची व्यवस्था पाहण्यासाठी जिल्हाधिकारी हिमांशू गुप्ताही एमडीएम रुग्णालयात पोहोचले. हे कुटुंब चुरू येथील रहिवासी असून ते नागना कुल देवीच्या दर्शनासाठी जात होते. त्यावेळी हा अपघा घडला.

ट्रक आणि बोलेरोची धडक - पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, रात्री एक वाजण्याच्या सुमारास बिलाराजवळील जुर्ली फांटाजवळ ट्रक आणि बोलेरोची धडक झाली. ज्यामध्ये बोलेरोमधील 6 जणांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच बिलाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना रुग्णालयात पाठवण्यात आले. मृतांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी बिलारा शवागारात पाठवण्यात आले आहेत.

बिलारा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला - पोलिसांनी सांगितले की, दुपारी एक वाजण्याच्या सुमारास जयपूरकडून येणारी बोलेरो ट्रकच्या मागे घुसली. या अपघातात चुरूचे रहिवासी विजय सिंग, उदय प्रताप सिंग, मंजू कंवर, प्रवीण सिंग, दर्पण सिंग आणि मधुकंवर यांचा मृत्यू झाला. यामध्ये ३ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, 3 जणांचा बिलारा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. अपघातात जखमी झालेल्या संजू कंवर आणि पवन सिंग यांना जोधपूरला रेफर करण्यात आले आहे, तर चैन सिंग यांच्यावर बिलारा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी सांगितले की, चुरू येथे राहणारे हे कुटुंब नागणा कुलदेवीच्या दर्शनासाठी जात होते. यादरम्यान हा अपघात झाला.

हेही वाचा - Petrol-Diesel Prices Today : पेट्रोल डिझेलच्या दरात स्थिरता; वाचा आजचे दर

Last Updated : Apr 15, 2022, 8:52 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.