नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी ( Prime Minister Narendra Modi ) यांनी नवी दिल्लीतील प्रगती मैदानावर ( Pragati Maidan in Delhi ) 5G सेवा सुरू केली. Jio, Airtel या भारतात 5G सेवा सुरू ( 5G service launched in the countryb ) करणाऱ्या पहिल्या कंपन्या असतील. सुरुवातीला, 5G सेवा फक्त निवडक शहरांमध्ये उपलब्ध असेल. त्याचा विस्तार नंतर केला जाईल.
5G सेवा : भारतात 5G ची चाचणी पूर्ण झाली आहे. 5G कॉलची चाचणी यशस्वी झाली आहे. 5G सह व्हिडिओ कॉलिंग, व्हॉईस कॉलिंग या दोन्ही सेवांची चाचणी घेण्यात आली. या सर्व तयारीदरम्यान भारतात मोबाईल नेटवर्कची नवी शर्यत सुरू होणार आहे. या सगळ्यात या सेवेमुळे दळणवळण क्षेत्रात काय बदल होणार आहेत हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर 5G सेवेबाबत भारताची स्थिती काय आहे. भारताच्या शेजारी राष्ट्रांमध्ये, जगभरात काय सुरू आहे. ही सेवा कोणत्या देशात सुरू झाली आहे?
या देशांमध्ये आधीपासूनच 5G आहे : जगातील अनेक विकसित देशांमध्ये 5G सेवा आधीपासूनच कार्यरत आहे. असे अनेक देश आहेत जिथे 5G सेवेचा विचार केला जात आहे. युरोपियन देशांमध्ये समाविष्ट असलेल्या फ्रान्स, जर्मनीमध्ये 5G सेवा आधीपासूनच कार्यरत आहे. या देशांनी फार पूर्वी 5G सेवेवर काम सुरू केले होते. अनेक दिवसांपासून या हे देश 5G सेवेचा लाभ घेत आहे. युरोपियन देशांव्यतिरिक्त, 5G सेवा दक्षिण कोरिया, अमेरिका, दक्षिण अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, स्पेन, इटली, कॅनडा तर, काही आफ्रिकन देशांमध्ये कार्यरत आहे. रशियातही 5G सेवा सुरू आहे.
5G मुळे हे होणार बदल : देशात 5G सेवा सुरू झाल्यानंतर आता ग्राहकांना अधिक चांगली संपर्क सुविधा मिळू शकणार आहे. कॉल कनेक्टिव्हिटी अधिक चांगली होईल. कॉलचा आवाज स्पष्ट होईल. त्याचबरोबर व्हिडिओ कॉलिंगमध्येही बरीच सुधारणा होणार आहे. उच्च दर्जाचे व्हिडिओ उपलब्ध असतील. इंटरनेट वापरकर्ते चित्रपट, इतर गोष्टी काही सेकंदात डाउनलोड करता येतील. टीव्ही कार्यक्रम, मल्टीमीडिया इत्यादी उच्च दर्जात पाहण्यास सक्षम असतील. 5G कृषी, शिक्षण, आरोग्य, वाहतूक, वाहतूक व्यवस्थापन इत्यादींमध्ये क्रांती घडवू शकते. 5G तंत्रज्ञान आरोग्यसेवा, आभासी वास्तव या क्षेत्रातही आशेचा किरण दाखवत आहे.
जिओची 5G सेवा डिसेंबर 2023 पर्यंत देशभरात सुरू : अब्जाधीश उद्योगपती मुकेश अंबानी यांनी शनिवारी जाहीर केले की, त्यांची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओ पुढील वर्षी डिसेंबरपर्यंत देशभरात 5G सेवा सुरू करेल. Jio या महिन्याच्या अखेरीस 5G सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. इंडिया मोबाइल काँग्रेस-2022 च्या कार्यक्रमात अंबानी म्हणाले की, जिओ 5G स्वस्त सेवा सुरू करेल. डिसेंबर 2023 पर्यंत या सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध करून दिल्या जातील.