ETV Bharat / bharat

गोव्यात कोरोना कहर सुरूच, ५३ नागरिकांचा मृत्यू - गोवा लेटेस्ट न्यूज

कोरोनामुळे आणखीन ५३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर नव्याने १५६२ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे. तर कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याचा रुग्नालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे.

गोवा कोरोना
गोवा कोरोना
author img

By

Published : May 18, 2021, 5:42 AM IST

Updated : May 19, 2021, 12:30 AM IST

पणजी (गोवा) - राज्यात कोरोना कहर सुरूच आहे. कोरोनामुळे आणखीन ५३ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर नव्याने १५६२ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्वतः ट्विट करत दिली आहे. तर कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याचा रुग्नालयात उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे कारागृहातील इतर कोरोनाबाधित कैदीही हादरले आहेत.

कैद्याचा कोरोनामुळे मृत्यू

कोलवाळ मध्यवर्ती कारागृहातील एका कैद्याचा इस्पितळात उपचार सुरू असताना कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कारागृहातील इतर कोरोनाबाधित कैदीही हादरले आहेत. कारागृहातील कोरोनाबाधित कैद्यांना एका वेगळ्या कक्षात अलगीकरणात ठेवण्यात आले आहे. सर्व कैद्यांची कोरोना चाचणी करण्यात आली असून अनेकजण कोरोनाबाधित सापडले आहेत. एकाचवेळी ७० कैद्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याची घटना कारागृहात घडली होती.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे ट्विट

'राज्यातील कोविड रुग्णालयांना आधीच बॅकअप जनरेटर दिलेत'

दरम्यान वादळामुळे रविवारी गोवा मेडिकल कॉलेज (जीएमसी) मध्येही 15 मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र वादळाची तीव्रता पाहता राज्यातील सर्व कोविड रुग्णालयांना बॅकअप जनरेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. तर राज्यभरात बर्‍याच मोठ्या समस्या उद्भवल्या आहेत. आम्ही या सर्वांना सोडवत आहोत, पण जोरदार वारे आणि पावसामुळे आम्हाला कामात अडथळे येत आहेत. मात्र, आम्ही गोव्यातील सर्व कंत्राटदारांमार्फत 250 लोकांना आधीपासून सर्व वीज उपकेंद्रांवर उभे केले होते. आम्ही आता बेळगाव व कोल्हापूर येथून आणखी 150 कामगारांना बोलावले आहे. या कामगारांमार्फत राज्यातील वीजपुरवठा लवकरात लवकर पूर्ववत करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत. राज्यभर वीजपुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी दोन दिवस लागतील, अशी माहिती उत्तर गोव्याचे अधीक्षक अभियंता स्टीफन फर्नांडिस यांनी दिली आहे.

Last Updated : May 19, 2021, 12:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.