मुंबई - उत्तर प्रदेश, गोवा, मणीपुर, उत्तराखंड, पंजाब या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले ( Five States Assembly Elections 2022 ) आहे. यामध्ये विशेष करून उत्तर प्रदेश व गोवा निवडणुकीसाठी भाजपची कार्यकर्त्यांची टीम सज्ज झालेली आहे. फक्त महाराष्ट्रातून नाही तर यूकेमधील एनआरआय सुद्धा या प्रचारामध्ये सहभागी होणार ( NRI Team For BJP Election Campaign ) आहेत.
उत्तर प्रदेशात मोदी समर्थक एनआरकाय करणार प्रचार
१० फेब्रुवारी ते ७ मार्च दरम्यान देशात होणाऱ्या ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमध्ये उत्तर प्रदेश महत्त्वाचं राज्य ( UP Assembly Election 2022 ) आहे. केंद्रातील सत्तेचा रस्ता उत्तर प्रदेशमधून जातो असं सांगितलं जात. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये ४०३ विधानसभा मतदारसंघ आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपने तब्बल ३१२ जागांवर विजय संपादन केला होता. परंतु सध्याची परिस्थिती पाहता इतक्या जागा टिकून ठेवणे भाजपला तितकं सोपं नाही. म्हणूनच यूपीमध्ये पुन्हा सत्ता हासिल करण्यासाठी भाजप जोरात प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ५०० एनआरआय यूकेमधून उत्तरप्रदेशमध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( CM Yogi Adityanath ) यांच्या प्रचारासाठी सामील होणार आहेत. युकेमधून भारतात आलेल्या रश्मी मिश्रा या मूळच्या भदोही जिल्ह्यातील सेवापुरी नेवाडा येथील असून, त्या मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये प्रचारात सहभागी होण्यासाठी आल्या आहेत. रश्मी सांगतात की, पूर्वांचलमध्ये योगी आदित्यनाथ लोकप्रिय आहेत. त्यांनी मागील ५ वर्षात ज्या झपाट्याने युपीचा कायापालट केला आहे. त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांचही मोठ्या प्रमाणामध्ये सहकार्य आहे. पंतप्रधान मोदी लोकांच्या हितासाठी सर्वोतपरी प्रयत्न करत असून, युपीचा कायापलट त्यांनी केलेला आहे, असंही त्या सांगतात. त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या पद्धतीने देशामध्ये काम केलेले आहे त्याचा आम्हा एनआरआय लोकांना अभिमान आहे, असेही त्या म्हणाल्या. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांच्या जोरावर येथील जनता त्यांना पूर्ण बहुमताने विजयी करेल असा विश्वासही प्रश्न मिश्रा यांना आहे.
लडकी हू लड सकती हू!
"लडकी हू लड सकती हू", अशी घोषणा काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वड्रा ( INC Leader Priyanka Gandhi Wadra ) यांनी उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत दिली आहे. याबद्दल त्यांना विचारले असता प्रियंका गांधी यांचे हे नाटक आहे, नौटंकी आहे असं त्या सांगतात. इतके दिवस त्या कुठे होत्या, निवडणुकीच्या दरम्यान त्या समोर दिसतात. त्यांना खरेच मुलींच्या, स्त्रियांच्या बाबतीत चिंता असती तर इतके दिवस त्या लपून बसल्या नसत्या, असेही त्यांनी सांगितले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे युकेमध्ये एवढे प्रसिद्ध आहेत ( PM Modi Populer In UK ) की ते तिथे आल्यानंतर तिथली भारतीय जनता संपूर्णपणे त्याच्या पाठीशी उभी राहते व आता निवडणुकीच्या दृष्टीने त्यांना आमचं सहकार्य लाभत आहे ही आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे असेही त्या म्हणाल्या.
गोव्याची पूर्ण जबाबदारी फडवणीस यांच्या खांद्यावर
गोवा राज्याच्या विधानसभा निवडणुकीची ( Goa Assembly Election 2022 ) जबाबदारी मुख्यत्वे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis In Goa Election ) यांच्यावर असल्याने तिथे सुद्धा महाराष्ट्र व मुंबईमधून कार्यकर्ते जोरात निवडणुक प्रचारासाठी प्रयत्न करणार आहेत. २०१७ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये गोव्यात एकूण ४० जागांपैकी काँग्रेसला १७ जागांवर विजय मिळाला असला तरी, भाजपने १३ जागा जिंकूनही सत्ता स्थापन केली होती. परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये भाजप नेते माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर ( Ex CM Manohar Parrikar ) नंतर गोव्यात पहिल्यांदाच निवडणूक होत असल्याकारणाने तेथील जनता कोणाच्या बाजूने कौल देते हे पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. परंतु बिहार विधानसभा निवडणुकीची ( Bihar Assembly Election ) जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडल्यानंतर गोव्याची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिल्याने तेही जबाबदारी कशा पद्धतीने पार पाडतात हे पाहणे सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे. एकीकडे कोरोना परिस्थिती हाताळण्यात सरकारवर टीका केली जात आहे. गोव्यात खाणींना परवानगी देण्यावरूनही वाद निर्माण झालेला आहे. भाजप सरकारच्या ३ महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना पर्यावरणवाद्यांचा विरोध आहे. हे गोव्यात यंदाच्या निवडणुकीतील प्रचाराचे प्रमुख मुद्दे असणार आहेत. त्याचबरोबर भाजपला काँग्रेसबरोबरच तृणमूल काँग्रेस ( TMC In Goa Election ) व आम आदमी पक्ष ( Aam Adami Party In Goa Election ) यांच्याशीही दोन हात करावे लागणार आहेत.