कन्नौज - जिल्ह्यात कोरोनाचा कहर कायम आहे. शहरासह ग्रामीण भागातही कोरोनाचा संसर्ग झपाट्याने पसरत आहे. चांगल्या उपचारांच्या अभावामुळे मृत्यूचा आकडा वाढतच आहे. अशा परिस्थितीत मृतदेहांचे अंत्यसंस्कार करण्याऐवजी लोकांनी महादेवी गंगा घाटाच्या काठावर मृतदेह दफन करण्यास सुरवात केली आहे. आतापर्यंत 50 हून अधिक मृतदेह पुरण्यात आले आहेत. तसेच महादेवी गंगा घाटात एका महिन्यात सुमारे दोन हजार लोकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.
समिती गठीत, तीन दिवसांत चौकशी अहवाल मागितला
घाटावर मृतदेह आढळल्यानंतर जिल्हा प्रशासनात खळबळ उडाली. एडीएम गजेंद्र सिंह यांनी तीन सदस्यांची टीम गठीत केली आहे. ही टीम तीन दिवसांत एडीएमकडे चौकशी अहवाल सादर करेल. या पथकात सदर एसडीएम गौरव शुक्ला, सीओ सदर शिव प्रताप सिंह आणि एसीएमओ डॉ जेपी सलोनिया यांचा समावेश आहे.
मृत्यूची संख्या वाढली -
कोरोना साथीच्या आजारामुळे मोठ्या संख्येने लोकांचा मृत्यू झाला आहे. इतके मृत्यू कशामुळे झाले, याबद्दल कोणीही जबाबदारीने बोलायला तयार नाही. परंतु पुरलेल्या मृतदेहांकडे पाहता असे अनुमान काढले जाऊ शकते की जिल्ह्यात मोठ्या संख्येने लोक मरण पावले आहेत. मृत्यूची संख्या वाढली असून शहरातील स्मशानभूमीत जागा कमी पडली आहे. अत्यसंस्कारासाठी जागा नसल्याने मृतदेह गंगेच्या काठी वाळूमध्ये पुरण्यात येत आहेत. पाण्याची पातळी वाढल्यानंतर वाळूतील मृतदेह नदीत वाहत जातील. यामुळे गंगेचे पाणी प्रदूषित होईल.