ETV Bharat / bharat

Manja Killed Child : एन दिवाळीत मांजा मुळे 5 वर्षीय मुलाचा गेला जीव

author img

By

Published : Oct 24, 2022, 12:02 PM IST

संपूर्ण देशात मांजा धाग्यावर विक्रीवर बंदी (Ban on sale of manja) आहे, त्यातल्या त्यात नायलाॅन मांजा (manjha) आधिक घातक (Nylon manja is dangerous) आहे मात्र आपल्याकडे त्याची विक्री थांबलेली नाही.रविवारी दिवाळीच्या दिवसात याच मांजा मुळे एका 5 वर्षीय बालकाचा मृत्यू (5 yearold boy lost his life due to Manja) झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे.

Manja Killed Child
मांजा मुळे मुलाचा गेला जीव

बेळगावी: संपूर्ण देशात मांजा धाग्यावर विक्रीवर बंदी (Ban on sale of manja) आहे, त्यातल्या त्यात नायलाॅन मांजा (manjha) आधिक घातक (Nylon manja is dangerous) आहे. ज्या दिवसात मांजाची मोठ्या प्रमाणावर विक्री होते त्यावेळी मांजाच्या दुकानांवर कारवाई केल्याचे दाखवले जाते मात्र आपल्याकडे मांजाची विक्री अद्याप थांबलेली नाही. मांजा धाग्यावर मुळे देशभरात अनेक लोक जखमी होतात त्याच बरोबर अनेकांना आपला जीव गमवावा लागतो. दिवाळी सणाच्या दिवसात रविवारी याच मांजा मुळे एका 5 वर्षीय बालकाचा मृत्यू (5 yearold boy lost his life due to Manja) झाल्याची दुर्देवी घटना समोर आली आहे.

बेळगावी येथे मांजाच्या धाग्याने 5 वर्षाच्या मुलाचा बळी घेतला. हुक्केरी तालुक्यातील नंतपूर गावातील रहिवासी असलेल्या वर्धन एरन्ना बेली (५) याचा बेळगावातील गांधी नगर येथील राष्ट्रीय महामार्गावर मांजामुळे गळा चिरल्या गेल्यामुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे दिवाळी सणाचा एक भाग म्हणून नवीन कपडे खरेदी करण्यासाठी हे मूल वडिलांसोबत बेळगावी शहरात आले होते.

दिवाळीच्या आनंदात कपडे खरेदी केल्यानंतर हा मुलगा दुचाकीसमोर बसला होता आणि त्याचे वडील एरण्णा दुचाकीहे चालवत होते. याचदरम्यान अचानक त्या चिमुकल्या मुलाच्या गळ्यात पतंगाचा मांजा अडकला, आणि गाडीच्या वेगात कोठेतरी अडकलेल्या मांजाने त्या मुलाची मान कापली गेली. त्याच्या मानेला एवढी खोल जखम झाली की त्याचा जागीच मृत्यू झाला होता. मांज्याच्या धाग्यावर बंदी असतानाही तो बाजारात विकला जातो.

देशभरात विविध सण उत्सवावा पतंग उडवण्याची प्रथा आहे त्या शिवाय सुट्यात मुले आणि अनेक पतंग प्रेमी पतंगबाजी आनंदाने करतात. पण त्या वेळी ते वापरत असलेला मांजा हा चायनिज आणि नाॅयलाॅनचा वापरला जातो जो घातक आहे. एकमेकांचा पतंग काटण्याच्या स्पर्धेतुन असे मांजा वापरण्यात येतात आणि घात होतो. जिल्हा प्रशासन आणि पोलिसांनी मांजावर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी मागणी मुलाच्या कुटुंबीयांनी केली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.