ETV Bharat / bharat

Fitness Beginners : नव्याने व्हर्च्युअल व्यायामाची सुरुवात करणाऱ्यांसाठी 5 सुचना

आजकालच्या लाईफस्टाईल नुसार आपल्याला भरपूर व्यायामाची गरज असते. मात्र मोबाईलचा वाढता वापर आणि सतत खेळले जाणारे मोबाईल वरील गेम, यामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. म्हणुन आपण आपले आरोग्य निट सांभाळायला हवे. जाणुन घेऊया नव्याने (5 tips for virtual fitness beginners) व्हर्च्युअल व्यायामाची सुरुवात करणाऱ्यांसाठी 5 सुचना.

Fitness Beginners
व्हर्च्युअल व्यायाम
author img

By

Published : Nov 21, 2022, 5:05 PM IST

New Delhi: आजकालच्या लाईफस्टाईल नुसार आपल्याला भरपूर व्यायामाची गरज असते. मात्र मोबाईलचा वाढता वापर आणि सतत खेळले जाणारे मोबाईल वरील गेम, यामुळे आपले आरोग्य धोक्यात येऊ शकते. म्हणुन आपण व्यायाम (5 tips for virtual fitness beginners) करायला हवा.

फिटनेसचा व्हर्च्युअल गेम काळजीपूर्वक निवडा: असंख्य प्रकारचे व्हर्च्युअल गेम खेळतांना तुम्ही केवळ स्थिर उभे राहता किंवा बसता. यादरम्यान केवळ हात हलवले जाते. मात्र संपुर्ण शरीरातील स्नायुंचा व्यायाम यामुळे होत नाही. त्यामुळे या प्रकारचे खेळ खेळून तुम्ही तुमची ऍथलेटिक स्थिती लक्षणीयरीत्या वाढवू शकणार नाही. खर्‍या व्यायामामुळे हृदय गती वाढते, रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढते आणि भरपूर घाम येतो. तुम्हाला VIRO MOVE सारख्या व्यायामांमध्ये ठोसे मारणे, चकमा देणे, अडथळे टाळणे, क्रॉच करणे आणि वास्तविक शारीरिक प्रशिक्षणाचे अनुकरण करणारे आणखी अनेक कृती करणे भाग पडते.

तुमच्या विकासाचे अनुसरण करा: दररोज आपण करीत असलेल्या व्यायामाचे अनुकरण करा. त्याचे मोजमाप करा. आणि हळुहळु व्यायामाच्या बाबतीतला आपला वेग आणि वेळ वाढवा.

अतिरेक करणे टाळा : सुरुवातीला व्यायाम करतांना दररोज पाच- पाच मिनिटे वाढवा. टप्प्या-टप्प्याने केलेले हे प्रयत्न, तुमच्या मनाला आणि शरीराला प्रयत्नांशी जुळवून घेण्यास मदत करतील. मजबूत हाडे, मोठे स्नायू, ताकद आणि अगदी चांगला मूड मिळविण्यासाठी, तुम्ही कठोर परिश्रम केले पाहिजेत. VR फिटनेस तुम्हाला यामध्ये मदत करू शकते. परंतु लक्षात ठेवा की खेळामध्ये अयोग्यरित्या किंवा जास्त प्रमाणात व्यस्त राहिल्याने नुकसान होऊ शकते.

तुमच्या वृत्तीमध्ये सकारात्मक आणि वास्तववादी राहा: वजन कमी करणे, सहनशक्ती वाढवणे, लवचिकता आणि सामर्थ्य यासारख्या दीर्घकालीन उद्दिष्टांसाठी तुमचे समर्पण आणि सकारात्मक वृत्ती, वेळ या दोन्हींची गरज आहे. आपला व्यायाम आणि खाणे आवश्यक आहे, तेवढेच थकलेल्या स्नायूंना आराम देणे देखील आवश्यक आहे. एका आठवड्यात यशाची अपेक्षा करू नका. हे करायला महिने लागतील. तुमची उद्दिष्टे वस्तुनिष्ठपणे तपासा. सर्वात महत्वाचा घटक म्हणजे त्यावर अंमलबजावणी करा.

विश्रांती आणि पुनरावृत्ती : अत्यंत निपुण ऍथलीट देखील कठोर कसरत नंतर विश्रांती घेण्याचे मूल्य ओळखतात. दररोज रात्री किमान आठ तास झोपण्याचा प्रयत्न करा आणि आठवड्यातून किमान एक दिवस आरामात घालवा. त्यानंतर, तुम्ही खात्री बाळगू शकता की, प्रत्येक वर्कआउट आधीच्या व्यायामापेक्षा अधिक विश्वासार्ह आणि शक्तिशाली असेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.