ETV Bharat / bharat

Mainpuri Murder : नवविवाहित जोडप्यासह कुटुंबातील 5 जणांची हत्या, खून केल्यानंतर स्वतःवर गोळी झाडत आरोपीची आत्महत्या - मैनपुरीत सहा जणांची हत्या

मैनपुरी जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच लोकांची हत्या केल्याची घटना घडली आहे. मारेकऱ्याने नवविवाहित भावाला आणि त्यांच्या पत्नीला ठार केले. भावाचे लग्न होऊन फक्त एक दिवस झाला होता. मैनपुरीमधील या हत्येच्या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. दरम्यान पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून हत्या का करण्यात आली याचा शोध घेत आहेत.

नवविवाहित जोडप्यासह कुटुंबातील 5 जणांची हत्या

author img

By

Published : Jun 24, 2023, 1:56 PM IST

मैनपुरी: उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. नवविवाहित जोडप्यासह एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या झाली आहे. या कुटुंबात शुक्रवारी लग्नाचा बॅण्ड वाजता होता, आज या घरात आक्रोश आणि दु:खाचा डोंगर कोसळला आहे. कुटुंबातील मोठ्या मुलाने नवविवाहित लहान भावासह कुटुंबातील पाच लोकांची हत्या केली. हत्या केल्यानंतर मारेकरी मुलाने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. घरातील व्यक्तींची हत्या का केली, काय कारण होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

कोणी केली हत्या : पोलीस निरीक्षक विनोद कुमार यांनी सांगितले की, हत्या झालेल्या घरात लग्न सोहळ्याचा कार्यक्रम होता. आटावा येथून लग्नविधी करून आल्यानंतर शुक्रवारी रात्री नवविवाहित जोडप्यासह कुटुंबातील सदस्यांची हत्या झाली. रात्री 11 वाजेपर्यंत नाचणे आणि गाण्याचा कार्यक्रम झाला. त्यानंतर रात्रीचे जेवण झाल्यानंतर सर्व लोक झोपी गेले. रात्री 3 वाजण्याच्या दरम्यान शिववीर नावाच्या तरुणाने आधी घराच्या छतावर झोपलेल्या सोनू आणि त्याची पत्नी सोनी यांची खंजीर खुपसून हत्या केली. त्यानंतर भाऊ भुल्लन, भावाचा मित्र दीपक, मेहुणा सौरभ यांचीही हत्या केली. सोनू यादव हा शिववीर यादव (30) यांचा भाऊ होता. तो गोकुलपूर अरसारा येथील रहिवासी होता. शुक्रवारी सोनू हा इटावाहून गावी परतला होता. रात्रीचे जेवण झाल्यानंतर सर्वजण झोपी गेले. यानंतर शिववीरने त्यांचा खून केला. शिववीर हा सर्वात मोठा भाऊ होता.

पत्नी आणि वडिलांवर हल्ला : या घटनेविषयी मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने आपल्या पत्नीवर आणि मामीवरही हल्ला केला होता. शिववीरच्या हल्ल्यात पत्नी डॉलीच्या हातावर जखम झाली आहे. तिच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहेत. मारेकरी शिववीर याने आपली मामी सुषमावर हल्ला केला होता. त्याही जखमी झाल्या असून त्यांच्यावरही जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुषमा ह्या रामलाल थाना भरथना इटवा येथील राहणाऱ्या आहेत. वडील सुभाषचंद्र यांच्यावरही शिववीर याने हल्ला केला होता. दरम्यान आरडाओरड झाल्यानंतर सून स्वजनने शिववीर याला पकडण्याचा प्रयत्न केला. पण शिववीर घराच्या पाठीमागे पळून गेला आणि तेथे त्याने स्वत:ताच्या डोक्यावर गोळी झाडून घेतली.

शिववीर कॉम्प्युटर सेंटर चालवायचा : गावात राहणाऱ्या सुभाष यांचा मुलगा शिववीर हा नोएडामध्ये एक कॉम्प्युटर सेंटर चालवत होता. शुक्रवारी त्याचा लहान भाऊ सोनूच्या लग्नाची वरात इटावा येथून आली होती. रात्री सोनू आणि त्याची नवविवाहित पत्नी सोनी हे घराच्या छतावर झोपायला गेले होते. तर शिववीर यांचा लहान भाऊ भुल्लन आणि त्याचा मित्र दीपक हे खाली घरात झोपले होते. दीपक हा फिरोजाबाद येथील राहणारा होता. तर मेहुणा सौरभ हे हवेलिया तालुक्यातील किशनी येथील रहिवाशी होते. मेहुणा सौरभ आणि इतर पाहुणे हे घरात झोपले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.