नवी दिल्ली- नैसर्गिक आपत्तीमुळे ( hydro meteorological calamities deaths in MH ) महाराष्ट्रात जुलै ते नोव्हेंबर 2021 पर्यंत 489 जणांचा मृत्यू झाला आहे. तर आंध्रप्रदेशमध्ये 46 जणांचा मृत्यू ( hydro meteorological calamities deaths in Andhra ) झाल्याची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय ( Home Nityanand Rai to Rajya Sabha ) यांनी राज्यसभेत दिली.
राज्यांनी दिलेल्या आकडेवारीवरून मृतांची आकडेवारी असल्याचे गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी स्पष्ट केले आहे. नैसर्गिक आपत्तीत पूर, अतिवृष्टी आणि भूस्खलन यांचा समावेश आहे. महाराष्ट्राला यंदा अतिवृष्टीचा मोठा फटका ( flood in Maharashtra 2021 ) बसलेला आहे.
महाराष्ट्राला पुराचा मोठा फटका-
महाराष्ट्रात जुलैमध्ये सर्वत्र पावसानं थैमान घातले होते. त्यातल्या त्यात कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रातल्या काही भागात भीषण पूर-परिस्थिती निर्माण झाली होती. यंदाच्या पावसाळ्यात १ जून ते २६ जुलै दरम्यान राज्यात ६५३.६ इतका सरासरी पाऊस कोसळला.
एनडीआरएफ, आर्मी मदतीसाठी धावली-
अतिवृष्टीकाळात एनडीआरएफच्या ३३ टीम आणि आर्मीच्या तीन टीम जुलै 2021 मध्ये बचावकार्यासाठी उतरल्या होत्या. हेलिकॉप्टर, बोटीच्या सहाय्याने अनेकांना मृत्यूच्या दाढेतून बाहेर काढले. पूरस्थिती नियंत्रणात येईपर्यंत जीवाची बाजी लावून या टीमने मदत कार्य केले होते.
हेही वाचा-Goa Assembly Elections 2022 : डिचोली मतदारसंघ भाजपचा बालेकिल्ला, काँग्रेस कमकुवत