ममल्लापुरम: भारत ब संघाने मंगळवारी 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या ( 44th Chess Olympiad ) खुल्या गटात कांस्यपदक जिंकले ( India B team wins bronze ) आहे. त्याचबरोबर भारत अ संघाने महिला विभागातही तिसरे स्थान पटकावले. भारत ब संघाने अंतिम सामन्यात जर्मनीचा 3-1 असा पराभव करून तिसरे स्थान पटकावले.
खुल्या गटात उझबेकिस्तानने नेदरलँडला हरवून सुवर्णपदक ( Uzbekistan beat Netherlands to win gold medal ) पटकावत सर्वांनाच चकित केले. आर्मेनियाच्या बलाढ्य संघाने खुल्या गटात दुसरे स्थान पटकावले. संघाने त्यांच्या अंतिम फेरीच्या सामन्यात स्पेनचा 2.5-1.5 ने पराभव केला.
-
1️⃣st Indian women's team to finish on podium at the #ChessOlympiad 😎🔥
— All India Chess Federation (@aicfchess) August 9, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Congratulations to Ukraine and Georgia for winning 🥇 & 🥈 respectively 👏
📸: FIDE/Lennart Ootes@FIDE_chess | @DrSK_AICF | @Bharatchess64 pic.twitter.com/ONBq337MPA
">1️⃣st Indian women's team to finish on podium at the #ChessOlympiad 😎🔥
— All India Chess Federation (@aicfchess) August 9, 2022
Congratulations to Ukraine and Georgia for winning 🥇 & 🥈 respectively 👏
📸: FIDE/Lennart Ootes@FIDE_chess | @DrSK_AICF | @Bharatchess64 pic.twitter.com/ONBq337MPA1️⃣st Indian women's team to finish on podium at the #ChessOlympiad 😎🔥
— All India Chess Federation (@aicfchess) August 9, 2022
Congratulations to Ukraine and Georgia for winning 🥇 & 🥈 respectively 👏
📸: FIDE/Lennart Ootes@FIDE_chess | @DrSK_AICF | @Bharatchess64 pic.twitter.com/ONBq337MPA
महिला विभागात, अव्वल मानांकित भारत अ संघाला 11व्या आणि अंतिम फेरीत अमेरिकेकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे सुवर्णपदकाच्या त्यांच्या आशा धुळीला मिळाल्या. कोनेरू हम्पीच्या नेतृत्वाखालील संघाने तिसरे स्थान पटकावले.
उझबेकिस्तानने खुल्या विभागात पटकावले सुवर्णपदक -
आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने (FIDE) सांगितले की, 14 व्या मानांकित उझबेकिस्तान संघाने 44 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडच्या खुल्या विभागात सुवर्णपदक जिंकले. तर आर्मेनिया आणि भारत-2 च्या संघाने रौप्य आणि कांस्यपदक जिंकले. युक्रेनने महिला गटात सुवर्णपदक जिंकले आहे. युवा खेळाडूंनी बनलेल्या भारत ब संघाने 11व्या आणि अंतिम फेरीत जर्मनीविरुद्ध 3-1 असा विजय नोंदवला.
हेही वाचा - Kris Srikkanth Statement : अक्षर आणि शमी आशिया कपसाठी भारतीय संघात असायला हवे होते कृष्णमाचारी श्रीकांत