ETV Bharat / bharat

42 Crore Cash Recovered : कर्नाटकात राजकीय नेत्याच्या नातेवाईकाच्या घरी सापडली '25 खोके' रोकड

42 Crore Cash Recovered : कर्नाटकात आयकर विभागाच्या छाप्यादरम्यान एका राजकीय नेत्याच्या नातेवाईकाच्या घरातून तब्बल 42 कोटींची रोकड जप्त करण्यात आली आहे. सध्या आयकर विभागाचे अधिकारी याप्रकरणी चौकशी करत आहेत.

42 Crore Cash Recovered
42 Crore Cash Recovered
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 13, 2023, 12:42 PM IST

बेंगळुरू 42 Crore Cash Recovered : देशातील पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. निवडणुका जाहीर होताच राज्य सरकार आणि प्रशासनही सतर्क झालंय. कर्नाटकातील बेंगळुरू इथं एका राजकीय नेत्याच्या नातेवाईकाच्या घरावर आयकर विभागानं छापा टाकलाय. याशिवाय आयकर विभागाच्या अधिकार्‍यांनी कंत्राटदार, ज्वेलर्स, बेंगळुरूच्या माजी आणि विद्यमान नगरसेवकांच्या घरांवरही छापेमारी केली आहे.

25 खोक्यांत सापडले 42 कोटी रुपये : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बेकायदेशीरपणे पैसे गोळा केले जात असल्याची माहिती आयकर विभागाला सूत्रांकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारावर टाकलेल्या छाप्यात आयकर विभागाच्या पथकाला मोठं यश मिळालंय. या छाप्यादरम्यान एका राजकीय नेत्याच्या नातेवाईकाच्या घरातून आयकर विभागाला सुमारे 25 खोक्यांतून तब्बल 42 कोटी रुपयांची रोकड सापडली.

राजकीय नेता आणि नातेवाईकांची चौकशी सुरू : मिळालेल्या माहितीनुसार, बेंगळुरूच्या आरटी नगर भागात एका माजी नगरसेवकाच्या नातेवाईकाच्या घरी आयकर विभागाकडून छापा मारण्यात आला. या छाप्यात आयकर विभागाला या राजकीय नेत्याच्या नातेवाईकाच्या फ्लॅटमध्ये पलंगाखाली चलनी नोटांच्या बंडलांनी भरलेली अनेक खोकी सापडली. हे पाहून आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनाही मोठा धक्का बसला. त्यानंतर ही रोकड जप्त करण्यात आली असून याप्रकणी एका राजकीय नेत्याची आणि त्यांच्या नातेवाईकांची चौकशी केली जात आहे. एकंदरीतच पाच राज्यांतील विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात एका राजकीय नेत्याच्या नातेवाईकाच्या घरी इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड सापडल्यानं एकच खळबळ उडालीय.

पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुका कधी : देशातील मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराममधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. मध्यप्रदेशमध्ये 17 नोव्हेंबर, छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबर, राजस्थानात 25 नोव्हेंबर, मिझोराममध्ये 7 नोव्हेंबर आणि तेलंगणात 30 नोव्हेंबरला विधानसभेसाठी मतदान होणार आहे. तर पाचही राज्यांची मतमोजणी एकाच दिवशी 3 डिसेंबरला होणार आहे.

हेही वाचा :

  1. Income Tax Raid In Karnataka: आयकर विभागाची मोठी कारवाई! 15 कोटींची रोकड अन् 5 कोटींचे दागिने जप्त
  2. ED Raid : मुंबईसह नागपुरात ईडीची मोठी कारवाई; 15 ठिकाणी छापे टाकत केले करोडोंचे दागिने आणि रोकड जप्त
  3. Cash Theft Case : भाजी व्यावसायिकाच्या घरातून ६० लाखांची रोकड लंपास, नोकरच निघाला चोरीचा सूत्रधार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.