आगरताळा (त्रिपुरा) - रविवारी रात्री आगरताळा शहराच्या बाहेरील भागात चार अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी 24 तासांत आरोपींना अटक करण्यात आली. यानंतर त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले, अशी माहिती तपास अधिकारी माणिक देबनाथ यांनी दिली.
पॉक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल
मनोजित देब्बर्मा (वय-19, रा. चंपकनगर), बीर कुमार देब्बर्मा (वय-21, रा. वर्धमान ठाकुरपारा), रिपोन देब्बर्मा (वय-19, रा. वर्धमान ठाकुरपारा), बिमल देब्बर्मा (वय-20, रा. बेलपारा), सजल देब्बर्मा (वय-20, रा. वर्धमान ठाकुरपारा), चंकाई देब्बर्मा (वय-19, रा. चंपकनगर) आणि विशाल शर्मा अशी आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर पॉक्सोसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - पासपोर्ट रिन्यू करण्याच्या मागणीसाठी कंगना रनौतची मुंबई उच्च न्यायालयात धाव
घटनास्थळावरुन पोबारा -
या चार अल्पवयीन मुलींना त्यांच्या चार मित्रांनी सहलीसाठी आमंत्रित केले होते. यानंतर ते आरोपींसोबत गेले. आरोपींनी त्यांना आगरताळा शहरातील सरकारी रबरच्या झाडांच्या परिसरात नेले. याठिकाणी संचारबंदी लागू असल्याने पोलिसांपासून बचाव व्हावा, यासाठी हे ठिकाणी निवडण्यात आले, असा आरोपही करण्यात आला. अल्पवयीन मुलींना जखमी केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला. नंतर पीडितांनी कसेतरी मुख्य रस्त्यावर पोहोचल्या. यानंतर त्या ऑटोने घरी पोहोचल्या. पुढील तपास सुरू आहे.