ETV Bharat / bharat

आंध्र प्रदेशमध्ये दोन बसेसची टक्कर, अपघातात चार ठार; मोठा अनर्थ टळला - आंध्र प्रदेश अपघात चार ठार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुंकरीपेटा गावामध्ये सकाळी सात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. ज्या ठिकाणी अपघात झाला त्याठिकाणी कचरा जाळला जात होता. या कचऱ्याच्या धुरामुळे समोरुन येणारी बस न दिसल्यामुळे हा अपघात झाला असा अंदाज वर्तवला जात आहे...

4 killed, 25 injured in road mishap in Andhra's Vizianagaram
आंध्र प्रदेशमध्ये दोन बसेसची टक्कर; अपघातात चार ठार
author img

By

Published : Mar 29, 2021, 3:14 PM IST

Updated : Mar 29, 2021, 3:55 PM IST

अमरावती : आंध्र प्रदेशच्या विजयानगरम जिल्ह्यात दोन बसेसमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा मृत्यू झाला. तर २५हून अधिक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. आज (सोमवार) सकाळच्या सुमारास ही दुर्घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुंकरीपेटा गावामध्ये सकाळी सात वाजेच्या सुमारास हा अपघात झाला. ज्या ठिकाणी अपघात झाला त्याठिकाणी कचरा जाळला जात होता. या कचऱ्याच्या धुरामुळे समोरुन येणारी बस न दिसल्यामुळे हा अपघात झाला असा अंदाज वर्तवला जात आहे.

दोन्ही चालक मृत..

या दोन्ही गाड्यांचे चालक अपघातात मृत झाले. यासोबत दोन प्रवाशांचाही यात मृत्यू झाला. जखमींपैकी पाच जणांची स्थिती गंभीर असल्याचे समजत आहे. या सर्वांना विजयानगरम जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दोन्ही गाड्यांमध्ये एकूण किती प्रवासी होते याबाबत निश्चित माहिती अद्याप समोर आली नसल्याचे विजयानगरम रुरल सर्कल इन्स्पेक्टर सत्या मंगा वेणी यांनी सांगितले.

मोठा अपघात टळला..

दरम्यान, या अपघातावेळी गॅस सिलिंडर घेऊन जाणाऱ्या एका मिनी लॉरीनेही बसेसला मागून टक्कर दिली होती. मात्र, या गाडीचा वेग कमी असल्याने आणि सिलिंडर रिकामे असल्याने मोठा अपघात टळला.

हेही वाचा : तामिळनाडूमध्ये अपघातात पाच ठार; साठहून अधिक जखमी

Last Updated : Mar 29, 2021, 3:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.