ETV Bharat / bharat

पोर्ट ब्लेअरच्या दक्षिण पूर्व भागात 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

भूकंप
भूकंप
author img

By

Published : Nov 8, 2021, 6:45 AM IST

06:22 November 08

पोर्ट ब्लेअरच्या दक्षिण पूर्व भागात 4.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप; नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण

पोर्ट ब्लेअर - अंदमान निकोबारमधील पोर्ट ब्लेअरच्या दक्षिण पूर्व भागात भूंकपाचे झटके जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3  नोंदविली गेली आहे.  भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

जमीन थरथरणे, हलणे, जमिनीला भेगा, कंपन होणे अथवा भूकवच अचानक काही क्षण हादरणे यास भूकंप म्हणतात. जमिनीखाली असलेल्या भूकंपाच्या उगमस्थानास भूकंपनाभी म्हणतात भूकंपनाभीच्या अगदी वर, भूपृष्ठावर असलेल्या बिंदूस भूकंपाचा केंद्रबिंदू म्हणतात. भूकंपाचे हादरे हे सौम्य किंवा तीव्र अशा दोन्ही स्वरूपाचे असू शकतात. पृथ्वीवर होणाऱ्या विध्वंसक भूकंपांपेक्षा सौम्य भूकंपांची संख्या खूपच जास्त असते.

भूंकप झाल्यास काय करावे -

  • इमारती, झाडे, पथदिवे आणि विजेच्या तारांपासून दूर व्हा.
  • भूकंपाचा धक्का बसलेले रस्ते, पूल आणि उतारावरुन जाण्याचे टाळा.
  • मोकळ्या मैदानात जाण्याचा प्रयत्न करावा.
  • घरातील स्टोव्ह, गॅस बंद करा.
  • उंचावरून घरंगळत येणाऱ्या दगडांपासून सावध राहा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.