शिमला - हिमाचल प्रदेशमधील कांग्रा जिल्ह्यात शनिवारी रात्री 8 वाजून 21मिनिटाच्या सुमारास भूकंपाचा धक्का बसला. 4.2 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचा हा धक्का होता. धौलाधर परिसराजवळील भरमौर भागात याची तीव्रता अधिक जाणवली. आसपासच्या परिसरातील भटियात, भरमौर, होली, डलहौजी, चंबा, कांग्रा, लाहौल-स्पिती याठिकाणी भूकंपाचै हादरे जाणवले.
भूकंपाचे केंद्रस्थान कांग्रातील करेरीपासून 10 किलोमीटर दूर होते. एसडीएम भरमौर मनीषकुमार सोनी यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले आहे. कोणत्याही भागात जीवित आणि वित्त हानी झाली नसल्याचे त्यांनी सांगितले. भरमौर येथे 5 जानेवारीला तीन भूकंपाचे धक्के जाणवले होते. 3.2 रिश्टर स्केल इतकी या भूकंपाची तीव्रता होती. आता एकाच आठवड्यात भूकंपाचा चौथा धक्का जाणवला आहे.
हेही वाचा - भंडारा दुर्घटनेची बाल हक्क संरक्षण आयोगाकडून दखल, 48 तासांत मागितला अहवाल