ETV Bharat / bharat

Rajiv Gandhi International Airport : सीमाशुल्क विभागाने जप्त केले कोट्यवधीचे सोने, दोघे अटकेत

शमशाबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ( Rajiv Gandhi International Airport ) तब्बल 1.65 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. दुबईतून सोन्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा लावून एका प्रवाशासह विमानतळात कार्यरत असलेल्या एका खासगी कर्मचाऱ्याला अटके केली आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Jun 2, 2022, 8:21 PM IST

हैदराबाद - शमशाबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ ( Rajiv Gandhi International Airport ) तब्बल 1.65 कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. दुबईतून सोन्याची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा लावून एका प्रवाशासह विमानतळात कार्यरत असलेल्या एका खासगी कर्मचाऱ्याला अटके केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सीमाशुल्क विभागाला दुबईहून अवैध सोने येणार असल्याची माहिती खबऱ्याकडून मिळाली होती. त्यानुसार अधिकाऱ्यांनी सापळा लावून पाळत ठेवली होती. त्यावेळी एका प्रवाशाच्या हलचालीवर अधिकाऱ्यांना शंका आली. तो जिनोम कोविड चाचणी केंद्रात जात होता, त्यावेळी त्याने काही प्लास्टिकच्या काही कॅरिबॅग कचऱ्याच्या डब्यात टाकल्या. लागलीच अधिकाऱ्यांनी त्या तस्काराला मुद्देमालासह ताब्यात घेतले. जप्त मुद्देमालामध्ये प्लास्टिकच्या चार कॅरिबॅमध्ये सोन्याची बिस्किटे व दोन कॅरिबॅगमध्ये सोन्याची पेस्ट सापडली.

दोघे अटकेत - कोरोना चाचणी केंद्रात कर्तव्य बजावणारा खासगी कर्मचारी व तस्कर यांच्यामध्ये संगनमत झाले होते. तस्कराची तपासणी झाल्यानंतर कचऱ्याच्या डब्यातील पाकिटे तो कर्मचारी तस्कराला देणार होता. त्यानंतर तो तस्कर कर्मचाऱ्याला विमानतळाबाहेर पाकिटे मिळाल्यानंतर काही सोने देणार होता.

हेही वाचा -Self Marriage : तरुणी करणार स्वतःशीच विवाह, 'या' दिवशी घेणार सप्तपदी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.