ETV Bharat / bharat

CM YS Jaganmohan Reddy New Cabinet : आंध्रप्रदेशात नवीन मंत्रिमंडळ स्थापन; पाहा, कोणाला मिळाली संधी?

मागील आठवड्यात आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी (Andhra Pradesh CM YS Jaganmohan Reddy) यांनी सर्व मंत्र्यांचे राजीनामे घेतले होते. मंत्रिमंडळात फेरबदल करण्याचसाठी हे राजीनामे घेतले होते. त्यानंतर आज (11 एप्रिल) रेड्डी यांनी आपले नवीन मंत्रिमंडळ स्थापन केले आहे. राज्यपाल बिस्व भूषण हरिचंदन (Governor Biswa Bhusan Harichandan) यांनी सुधारित मंत्रिमंडळाच्या 25 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ (Ministers Oath) दिली.

CM YS Jaganmohan Reddy
आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी
author img

By

Published : Apr 11, 2022, 4:13 PM IST

Updated : Apr 11, 2022, 5:12 PM IST

अमरावती(आंध्रप्रदेश) - आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगनमोहन रेड्डी (Andhra Pradesh CM YS Jaganmohan Reddy) यांनी सोमवारी त्यांच्या मंत्रिमंडळाची पुनर्रचना (Reconstituted Cabinet) केली आहे. राज्य सचिवालयाजवळ आयोजित समारंभात राज्यपाल बिस्व भूषण हरिचंदन यांनी सुधारित मंत्रिमंडळाच्या 25 मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी YSR काँग्रेसचे (YSRCP) नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. विशेष म्हणजे सरकार स्थापनेनंतर जगनमोहन सरकारमधील हा आतापर्यंतचा सर्वात मोठा फेरबदल आहे.

राज्यपालांनी दिली नवीन मंत्र्यांना शपथ - शपथ घेणार्‍यांपैकी अकरा जण जून 2019 पासून पूर्वीच्या मंत्रिमंडळाचा भाग होते. त्यांना आता पुन्हा संधी देण्यात आली आहे. तर उर्वरित नवीन चेहरे आहेत. अंबाती रामबाबू यांनी सर्वप्रथम शपथ घेतली. आदिमलुपू सुरेश, उषा श्रीचरणन आणि पेड्डीरेड्डी रामचंद्ररेड्डी यांनी इंग्रजीत शपथ घेतली तर इतर सर्व मंत्र्यांनी तेलुगूमध्ये शपथ घेतली. CM जगन मोहन रेड्डी यांनी 2019 मध्ये सत्तेत येताना आपल्या मंत्रिमंडळात मध्यावधी बदल करणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार हा फेरबंदल करण्यात आला आहे.

14 नवीन चेहऱ्यांना संधी - धर्मा प्रसाद राव, पी राजन्ना डोरा, गुडिवाडा अमरनाथ, बड्डी मुथ्याला नायडू, दादीशेट्टी राजा, कारुमुरी नागेश्वरराव, किट्टू सत्यनारायण, जोगी रमेश, अंबाती रामबाबू, मेरागा नागार्जुन, विडादला रजनी, काकानी गोवर्धनरेड्डी, आरके रोजा आणि उषा श्रीचरण

या चेहऱ्यांना पुन्हा मंत्रिमंडळात संधी - बोट्सा सत्यनारायण, पेद्दिरेड्डी रामचंद्ररेड्डी, नारायणस्वामी, बुग्गाना राजेंद्रनाथ, गुम्मनूरू जयराम, सिदिरी अप्पलाराजू, पिनिपे विश्वरूपम, चेलुबोइना वेणुगोपालकृष्ण, तनेती वनिता, अमजद बाशा आणि आदिमलुपू सुरेश.

सुधारित मंत्रिमंडळात अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST) आणि मागासवर्गीय (BC) यांना मोठ्या प्रमाणात स्थान देण्यात आले आहे. 25 पैकी एकूण 16 मंत्री अनुसूचित जाती (5), अनुसूचित जमाती (1) आणि BC (11) आहेत. मागील मंत्रिमंडळात या विभागांमध्ये १३ मंत्री होते (५ एससी, १ एसटी आणि ७ बीसी). मागील मंत्रिमंडळात तीन महिला होत्या, तर या नवीन मंत्रिमंडळात चार महिलांना संधी देण्यात आली आहे.

24 मंत्र्यांनी दिले होते एकत्र राजीनामे - आंध्रप्रदेशच्या सर्व 24 मंत्र्यांनी 7 एप्रिल रोजी मंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी (CM Jagan Mohan Reddy) यांच्याकडे राजीनामे सादर केले होते. राजीनाम्यांनंतर जगनमोहन रेड्डी यांच्या नव्या मंत्रिमंडळाची स्थापना कधी होणार आणि कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. 2024 च्या विधानसभा निवडणुका (Assembly election 2024) डोळ्यासमोर ठेवून मंत्र्यांची निवड केली असल्याची माहिती मिळत आहे.

Last Updated : Apr 11, 2022, 5:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.