नवी दिल्ली- ऑक्सिजनचा अपुरा पुरवठा आणि बेडची कमरता अशा समस्यांना सामोरे जाणाऱ्या दिल्लीकरांची डोकेदुखी आणखी वाढली आहे. नॉर्थ एमसीडी हिंदूराव रुग्णालयामधून २३ कोरोनाबाधित पळून गेले आहेत. नॉर्थ एमसीडीचे महापौर जयप्रकाश यांनी प्रशासन प्रकरणाचा तपास करत असल्याचे सांगितले आहे. सर्व रुग्णांचा ठावठिकाणा लावला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
नॉर्थ एमसीडीमध्ये हिंदुराव रुग्णालय हे सर्वात मोठे रुग्णालय आहे. या रुग्णालयात १८ एप्रिलपासून कोरोनाबाधितांवर उपचार करण्यात येत आहेत. १८ एप्रिलपासून हिंदुराव रुग्णालयामधील एकूण २३ कोरोनाबाधित पळून गेले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाची चिंता वाढली आहे.
हेही वाचा-पंचायत निवडणुकीचा परिणाम; उत्तर प्रदेशात कोरोनाच्या संसर्गात १२० टक्क्यांनी वाढ
याबाबत प्रश्न विचारला असता महापौर जयप्रकाश यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना म्हणाले, की या प्रकरणाचा महापालिका प्रशासन पूर्ण तपास करणार आहे. सध्या या रुग्णालयात ६०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर आजतागायत १५० रुग्णांना उपचार करून घरी सोडण्यात आले आहे. जे रुग्ण पळून गेले आहेत, त्यांचे पत्ते महापालिकेजवळ आहेत. त्या सर्व रुग्णांचा ठावठिकाणा लावला जात आहे.
हेही वाचा-महाराष्ट्रात तिसरी ऑक्सिजन एक्सप्रेस शनिवारी होणार दाखल
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.