डेरा बाबा नानक - बीएसएफच्या 10 बटालियनने भारत-पाकिस्तान सीमेवरील डेरा बाबा नानक चौकीजवळ भारतीय सीमेत प्रवेश करणाऱ्या 2 पाकिस्तानी नागरिकांना अटक केली. यासंदर्भात माहिती देताना डीआयजी प्रभाकर जोशी म्हणाले की, दोन्ही पाकिस्तानी नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे.
जोशी यांनी सांगितले की, किशन मसीह, मुलगा सलीम मसीह रा. भोला बाजवा जिल्हा नरोवाल पाकिस्तान आणि रबीज मसीह मुलगा साजिद मसीह रा. भोला बाजवा जिल्हा नरोवाल पाकिस्तान अशी त्यांची नावे आहेत. बीएसएफ जवानांकडून या व्यक्तींची कसून चौकशी केली जात आहे. त्यांच्याकडून 500 रुपये पाकिस्तानी चलन, दोन ओळखपत्रे, तंबाखूचे पाकीट आणि दोन मोबाईल फोनही सापडले आहेत.