ETV Bharat / bharat

CORONA UPDATE : भारतात 2.58 लाख नवीन कोरोना रूग्ण

देशात कोरोनाचे रुग्ण वाढतच (Corona patients in the country) आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2 लाख 58 हजारांहून अधिक रुग्ण नोंदवले गेले आहेत. सध्या देशात 16 लाखांहून अधिक कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत.

Corona Update
Corona Update
author img

By

Published : Jan 17, 2022, 10:21 AM IST

नवी दिल्ली : देशात कोरोनाच्या रुग्णांमध्ये थोडीशी घट झाली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे २ लाख ८ हजाक ८९ रुग्ण सापडले आहेत. कालच्या तुलनेत दैनंदिन प्रकरणांमध्ये ४ टक्क्यांनी घट झाली आहे. काल देशात कोरोनाचे 2 लाख 71 हजार 202 रुग्ण होते. यासह, गेल्या 24 तासात देशातील ओमायक्रॉन रुग्णांची एकूण संख्या 8 हजार 209 वर पोहोचली आहे. कालच्या तुलनेत ओमायक्रॉनच्या रुग्णांमधे 6.02 टक्के वाढ झाली आहे. कोरोनामुळे गेल्या २४ तासांत ३८५ मृत्यूची नोंद झाली आहे.

देशात सक्रिय प्रकरणांची संख्या 16 लाख 56 हजार 341 पर्यंत वाढली, तर एका दिवसापूर्वी देशात फक्त 15 लाख 50 हजार 377 सक्रिय रुग्ण होते. देशातील सक्रिय प्रकरणे सध्या एकूण प्रकरणांपैकी 4.43 टक्के आहेत, तर गेल्या काही दिवसांपासून बरे होण्याचे प्रमाण सातत्याने कमी होत असताना, सध्या ते 94.27 टक्क्यांवर आले आहे.

कोरोना संसर्गाच्या काळात सर्वात चांगली गोष्ट म्हणजे लोकांचे जलद बरे होणे. गेल्या 24 तासांत 1 लाख 51 हजार 740 लोक बरे झाले आहेत. त्यानंतर बरे झालेल्यांची एकूण संख्या 3 कोटी 52 लाख 37 हजार 461 झाली आहे.

सक्रिय रुग्ण : 16 लाख 56 हजार 341

बरे झालेले रुग्ण: 3 कोटी 52 लाख 37 हजार 461

एकूण मृत्यू: 4 लाख 86 हजार 451

एकूण लसीकरण: 1.57 कोटी 20 लाख 41 हजार 825

एकूण कोरोनाव्हायरस प्रकरणे: 8,209

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.