विजयवाडा (आंध्रप्रदेश) - अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने कहर केला असून, मुसळधार पावसामुळे आतापर्यंत १7 जणांचा मृत्यू झाला आहे. जिथे कडप्पा जिल्ह्यात ३० जण बेपत्ता असल्याची भीती व्यक्त केली जात होती.. यापैकी १२ मृतदेह सापडले आहेत. काल सकाळपासून पूर आला आहे. यातील ३ जणांची ओळख पटली. 1 व्यक्ती कंडक्टर आहे आणि इतर दोन बसचे प्रवासी आहेत. जिल्हाभरातील आणखी 18 जणांचा अद्याप ठावठिकाणा समजू शकलेला नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुसळधार पावसात घर झाले बेपत्ता -
चित्तूरमध्ये एकूण पाच जण बेपत्ता असून एका महिलेचा मृतदेह सापडला आहे. मुसळधार पावसामुळे घर उद्ध्वस्त झाल्याने अनंतपूर जिल्ह्यातील रामगिरी मंडलातील गंटीमारी येथे एकाचा मृत्यू झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री जगन यांची 5 लाख रुपय मदतीची घोषणा -
अतिवृष्टीमुळे कोणाचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना 5 लाख रुपयांची भरपाई देण्याचे निर्देश मुख्यमंत्री जगन यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला दोन हजार रुपये देण्याची सूचना त्यांनी केली.
वाहतूक ठप्प -
कालिकिरी येथील मदनपल्ले-तिरुपती मुख्य रस्त्यावरील कालिकिरी मोठ्या तलावात पाण्याचा जोर वाढल्याने या मार्गावरील वाहतूक वळवण्यात आली. मुसळधार पावसामुळे तिरुमला येथे भूस्खलन झाले. (landslide in tirumala) परिस्थिती धोकादायक असल्याने तिरुमाला तिरुपती देवस्थानमने (टीटीडी) (Tirumala Tirupati Devasthanams) तिरुमला येथील दोन घाट दोन दिवस बंद केले. सीएम जगन यांच्या आदेशानुसार रस्ते बंद करण्यात आल्याचे टीटीडीने सांगितले. त्यामुळे कपिलतीर्थ-थिरुमला बायपास रोडवर शेकडो वाहने अडकून पडली होती. टीटीडीने सांगितले की, भाविकांनी तिरुमला येथे येऊ नये. तिरुमला घाट रस्त्याची टीटीडीचे ईओ जवाहर रेड्डी यांनी पाहणी केली.
हेही वाचा - VIDEO : आंध्रप्रदेशमध्ये मुसळधार....; तिरुमलामध्ये भूस्खलन तर चित्तूर जिल्ह्यात चार महिल्या गेल्या वाहून