अजमेर - प्रतिभेला वयाची मर्यादा नसते. हे सिद्ध करून दाखवले आहे. राजस्थानच्या अजमेरमध्ये राहणाऱ्या आदिती कल्याणी या 13 वर्षीय मुलीने. तीने सिनेजगतातील 1940 ते 50 या काळातील सुप्रसिद्ध अभिनेत्रींचे चित्र रेखाटले आहे. अदिति कल्याणी हीने यापूर्वीही एक विक्रम रचला आहे. वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी एक पुस्तक लिहून सर्वांत कमी वयाची लेखिकेचा किताब अदितीने मिळवला आहे.
गेल्या तीन वर्षांपासून आदिती स्केचिंग शिकत आहे. 1950 च्या काळात महिलांनी तेवढे स्वातंत्र्य नव्हते. तरही या अभिनेत्रींनी अशा काळात सिनेमात काम केले. त्या काळात महिलांना शिक्षणापासूनही वचिंत ठेवण्यात येत. या काळात रुढीवादी पंरपरांना मोडीत काढत त्यांनी सीनेजगतात आपला ठसा उमटवला. यात काही अभिनेत्रींनी फक्त अभियन नाही. तर गायन, नृत्य आणि चित्रपट दिग्दर्शनात देखील कार्य केलं. त्यांच्या कार्याला सलाम देण्यासाठी मी हे चित्र रेखाटले आहे, असे अदितीने सांगितले.
या अभिनेत्रींचे चित्र रेखाटले -
सुरैया, रेहाना, श्यामा, संध्या, शकीला, निम्मी, कामिनी कौशल, सुलोचना लतकार, मुनव्वर सुल्ताना, नूरजहां, माला सिन्हा, मीना कुमारी, नूतन, वहीदा रहमान, मीना शौर्य, साधना बॉस यांचे चित्र अदितीने रेखाटले आहे.
अभिनेत्रींच्या चित्राकृतीचे प्रदर्शन भरवण्यात आले. यावेळी 60 पेक्षा जास्त वय असलेल्या व्यक्तींनी या अभिनेत्रींना ओळखलं. तर आताच्या पीढीतील तरुणा या अभिनेत्रींविषयी माहिती नसल्याने त्यांच्यासाठी हे प्रदर्शन ज्ञानवर्धक सिद्ध झालं आहे. त्यांना सिनेजगताच्या सुरवातीच्या काळातील अभिनेत्रींविषयी जाणून घेण्याची संधी मिळाली.