ETV Bharat / bharat

बस दरीत कोसळून 13 जणांचा मृत्यू; दोन जण गंभीर

उत्तराखंडमधील चकराता येथून विकासनगरकडे जात असलेली बस थेट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत बसमध्ये असलेल्या 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण हे गंभीर जखमी झाले आहे.

13-people-died-in-a-road-accident-at-vikasnagar-dehradun
बस दरीत कोसळून 13 जणांचा मृत्यू; दोन जण गंभीर
author img

By

Published : Oct 31, 2021, 3:23 PM IST

Updated : Oct 31, 2021, 4:19 PM IST

विकासनगर: उत्तराखंडमधील चकराता येथून विकासनगरकडे जात असलेली बस थेट दरीत कोसळल्याची घटना घडली आहे. या घटनेत बसमध्ये असलेल्या 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तर दोन जण हे गंभीर जखमी झाले आहे. घटनेची माहिती मिळताच एसडीआरएफ आणि पोलीस टीम हे घटनास्थळी पोहोचले आहेत. मदत आणि बचाव कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

बस दरीत कोसळून 13 जणांचा मृत्यू; दोन जण गंभीर

13 प्रवाशांचा मृत्यू, 2 जण गंभीर -

मिळालेल्या माहितीनुसार, चकराता येथील बायला गावातून विकासनगरकडे एक 15 प्रवाशांनी भरलेली एक गाडी जात होती. सकाळी 10 वाजता बायला-पिंगुवा मार्गावर या गाडीच्या चालकाचे नियंत्रण सुटून गाडी दरीत कोसळल्याने भीषण अपघात झाला. 13 प्रवाशांचा मृत्यू झाला असून दोन जण हे गंभीर जखमी झाले आहेत. घटनास्थळावर एसडीआरएफ चकराता पोलीस आणि तहसील कर्मचारी पोहोचले आहेत. स्थानिक नागरिकांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. 11 जण हे बायला येथील आहेत. तर एक मृतक हा मलेथा येथील असून खंडकाह गाव, जिल्हा सिरमौर हिमाचल येथील एक जण आहे.

जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू -

SDRF रेस्क्यू टीमचे HC योगेंद्र भंडारी यांनी सांगितले की, 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 2 जण हे गंभीर आहेत. रेस्क्यू टीमने 13 मृतदेह हे बाहेर काढले आहेत. तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे -

  • ईशा चौहान (18), (बायला गाव, चकराता)
  • रेखा चौहान (30), (बायला गाव, चकराता)
  • तानिया (11), (बायला गाव, चकराता)
  • मातवर सिंह (48), (बायला गाव, चकराता)
  • काजल (15), (बायला गाव, चकराता)
  • जयपाल (40), (बायला गाव, चकराता)
  • साधूराम (60), (बायला गाव, चकराता)
  • अंजलि (13), (बायला गाव, चकराता)
  • दान सिंह (60), (बायला गाव, चकराता)
  • रतन सिंह (50), (बायला गाव, चकराता)
  • नरेंद्र सिंह (35), (बायला गाव, चकराता)
  • जीतूराम (34), (बायला गाव, चकराता)
  • हरिराम (52), (खंडकाह गाव, जिल्हा सिरमौर हिमाचल)

हेही वाचा - पायी निघालेल्या दिंडीतील तिघा भाविकांना भरधाव वाहनाने चिरडले

Last Updated : Oct 31, 2021, 4:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.