ETV Bharat / bharat

11 हजार व्होल्टची वीजवाहिनी झाडाला बांधल्यानं नागरिकांमध्ये धास्ती, पाहा व्हिडिओ - 11 हजार व्होल्ट एचटी लाइन

11 Thousand Volt High Tension Line : अमेठीमध्ये झाडाला इन्सुलेटर बांधून 11 हजार व्होल्टची उच्चदाब वाहिनी टाकण्यात आलीय. त्यामुळं काही अनुचित प्रकार घडण्याची ग्रामस्थांना भीती आहे. याकडं विद्युत विभागाचं मात्र सातत्यानं दुर्लक्ष होत आहे.

11 Thousand Volt High Tension Line
11 Thousand Volt High Tension Line
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 6, 2023, 1:19 PM IST

वीज विभागाचा जीवघेणा खेळ

अमेठी 11 Thousand Volt High Tension Line : उत्तर प्रदेशातील अमेठी जिल्ह्यात वीज पुरवठ्यासाठी मध्यांचल विद्युत निगमनं कामचुकारपणाची हद्द ओलांडली आहे. गावातील कमी दाब वाहिनी झाडांना बांधून काढून टाकल्यानंतर आता झाडांना इन्सुलेटर बांधून 11 हजार व्होल्टच्या उच्चदाब वाहिनी सुरू करण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वी शॉर्टसर्किटमुळं झाडाला आग लागली होती. असं असतानाही वीज विभागाचे कर्मचारी आणखी मोठ्या दुर्घटनेची वाट पाहात आहेत का, असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहे. याप्रकरणी सातत्यानं तक्रारी करुनही समस्या सुटत नसल्याचं स्थानिकांनी सांगितलंय.

वीज कंपनी सतर्क नाही : उत्तर प्रदेशात वीज कंपनीचा अजब कारभार समोर आलाय. इथं दक्षिणवाडा वीज उपकेंद्रासमोरील जगदीशपूर रोडवर असलेल्या कृष्णा नगर मार्केटमधील एका झाडाला इन्सुलेटर बसवून 11 हजार व्होल्टची उच्च दाबाची विद्युतवाहिनी आहे. ग्रामस्थांनी सांगितलं की, वीजवाहिनी टाकली जात असताना तसं करण्यास मनाई होती. परिसरातील झाडं हिरवे होते. मात्र, आग लागल्यानंतर झाड वाळून गेले आहे,. असं असतानाही वीज कंपनी सतर्क झालेली नाही.

स्थानिकांच म्हणणं काय : स्थानिक ग्रामस्थ दुर्गेश कुमार मिश्रा यांनी सांगितलं की, 11 हजार उच्चदाब वाहिनी सुरू असल्यानं मोठी समस्या आहे. आम्ही याठिकाणाहून नेहमीच येत-जात असतो. मुलंही येत-जात राहतात. आमची शेती इथं आहे. कधी वीज गेली तर मोठा अपघात होऊ शकतो. इथून ट्रॅक्टरही जातात. अवघ्या महिनाभरापूर्वी शेतात झाडाला आग लागली होती. उच्चदाब वाहिनीमुळे अर्ध झाडंही जळालंय. आगीमुळं राष्ट्रीय महामार्गावर केव्हाही मोठी दुर्घटना घडू शकते. ही वाहिनी तयार होत असताना लोकांनी ही वाहिनी दुरुस्त करा, अशी तक्रार कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे केली. पण कोणी ऐकत नाही. 100 मीटर अंतरावर एक पॉवर हाऊस असूनही इतका मोठा निष्काळजीपणा दिसून येतो. खांब आणि तारा लावून ही वीजवाहिनी व्यवस्थित बांधली जावी, अशी मागणी या नागरिकांनी केलीय.

भविष्यात असे प्रकार घडू नये यासाठी सूचना : स्थानिक गया प्रसाद यांनी सांगितलं की, विद्युत विभागाच्या दुर्लक्षामुळं 11 हजार व्होल्टची उच्चदाब वीजवाहिनी हिरव्या व सुकलेल्या झाडांवरुन जात आहे. त्यामुळं कधीही अपघात होऊ शकतो. त्याचवेळी अधीक्षक अभियंता यांनी याबाबत माहिती मिळाली असल्याचं सांगितलं. हे निश्चितच चुकीचं आहे. आता मला या प्रकरणाची माहिती मिळत आहे. अशा परिस्थितीत आम्ही ताबडतोब कर्मचारी पाठवून ते दुरुस्त करुन घेऊ. भविष्यात असे प्रकार घडू नयेत यासाठी सूचनाही देणार असल्याचं सागितलंय.

हेही वाचा :

  1. अरे देवा! चोरट्यांनी चक्क मोबाईल टॉवरच चोरून नेला! ९ महिन्यानंतर गुन्हा दाखल
  2. UP Crime News : भुतांचा छडा लावणारा पोलीस अधिकारीच निघाला दरोडेखोर, गुजराती व्यावसायिकांकडून उकाळले 1.4 कोटी; 7 पोलीस कर्मचारी निलंबित

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.