बंगळुरू - कोरोनाच्या काळात कर्नाटक सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी 100 टक्के क्षमतेने चित्रपटगृहे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री बोम्माई यांनी ही माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.
कर्नाटकमध्ये 100 टक्के क्षमतेने चित्रपटगृहे सुरू होणार आहेत. मात्र, ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचा दर 1 टक्क्यांहून कमी आहे, त्या जिल्ह्यांमध्ये या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा-भारताशी नाते असलेल्या कमला हॅरिस यांना पंतप्रधान मोदींनी या' दिल्या खास भेटवस्तू
या असणार अटी-
- ज्या जिल्ह्यांमध्ये 1 ते 2 टक्के कोरोना संसर्गाचे प्रमाण आहे, त्या जिल्ह्यांमध्ये 50 टक्के क्षमतेने चित्रपटगृहे सुरू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.
- ज्या जिल्ह्यांमध्ये कोरोना संसर्गाचे प्रमाण 2 टक्क्यांहून अधिक आहे, अशा जिल्ह्यांमध्ये चित्रपटगृहे बंद राहणार आहेत.
- चित्रपटगृहामध्ये येणाऱ्या प्रेक्षकांकरिता कोरोनाचा एक डोस बंधनकारक आहे. मात्र, महिला आणि मुलांना चित्रपटगृहांमध्ये प्रवेश दिला जाणार नाही.
हेही वाचा-पेट्रोलसह डिझेल जीएसटीच्या कक्षेत कधी येणार? निर्मला सीतारामन यांनी 'हे' दिले उत्तर
शाळा सुरू करण्याची परवानगी
शाळांमध्ये सहावी ते बारावीच्या वर्गामधील विद्यार्थ्यांना 100 टक्के उपस्थिती राहण्याची परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हे वर्ग आठवड्यामधून 5 दिवस घेण्यात येणार आहेत. रात्री 10 ते पहाटे 5 वाजेपर्यंत संचारबंदी सुरू राहणार आहे.
हेही वाचा-UPSC 2020 RESULT मुंबई आयआयटीचे विद्यार्थी शुभम कुमार देशात प्रथम; 761 उमेदवार उत्तीर्ण
दसरा सणाकरिता स्वतंत्र मार्गदर्शक सूचना-
राज्यांच्या सीमावर्ती भागांमध्ये दक्ष राहण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. दसरा सणाकरिता स्वतंत्र मार्गदर्शक सूचना जाहीर करण्यात येणार आहेत. यादगीर, रायचूर, कलबुर्गी आणि म्हैसुर जिल्ह्यात जास्तीत जास्त कोरोना लसीकरण करण्याच्या मुख्यमंत्री बोम्माई यांनी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
कोरोना संसर्गामुळे गतवर्षी मार्च महिन्यापासून महाराष्ट्रातील चित्रपटगृहे बंद होती. मात्र अनलॉकप्रक्रियेत नोव्हेंबर महिन्यात राज्यात सिनेमागृहे सुरू करायला परवानगी मिळाली. असे असले तरी कोरोनाच्या भीतीने प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले आहे.