नागपूर: वर्ध्या जिल्ह्यातील सेलू तालुक्यात ज्ञान भारती कौशल्य विकास केंद्र येथे नुकतीच फिट 50 प्लस महिला ट्रान्स हिमालयन मोहीमे संदर्भात बैठक झाली. मोहिम 2022 आझादीचा अमृत महोत्सवला अर्पण करण्याचा निर्णय झाला. या साहसी मोहिमेत देशभरातील ५० ते ६० वयोगटातील 10 महिला सहभागी होणार आहेत त्या अरुणाचल प्रदेश ते लडाख अशा 40 पर्वतरांगा सर करणार आहे. या मोहिमेत टाटा स्टील ॲडव्हेंचर फाऊंडेशन (TSAF) द्वारे या मोहिमेचे आयोजन केले जात आहे. त्याला टाटा मोटर्स आणि टाटा स्पोर्ट्स क्लबचे आर्थिक सहकार्य असणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्याही शुभेच्छा
मोहिमेत सहभागी होणाऱ्या 10 सदस्यांच्या टीम सोबत वर्ध्याचा जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनीही संवाद साधला. आणि शाळेच्या तसेच कॉलेजच्या दिवसांतील NCC आणि साहसी उपक्रमांच्या आठवणींना उजळला दिला. जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी "तुमची पिढी केवळ माझ्यासारख्या लोकांसाठीच नाही तर सध्याच्या तरुणांसाठीही प्रेरणादायी आहे" असे म्हणत गिर्यारोहक बचेंद्री पाल यांच्या कडुन साहसी मोहिमे बद्दल जाणून घेत शुभेच्छा दिल्या.
नव्या जोमाने मोहिमेला सुरुवात
ही साहसी मोहीम नोव्हेंबर 2020 मध्येच ठरली होती जी मार्च 2021 मध्ये होणार होती. पण कोरोणा निर्बंधा मुळे मोहीम तेव्हा थांबवावी लागली होती. आता पुन्हा नव्या जोमाने या मोहिमेला सुरुवात होत आहे. मार्च 2022 मध्ये सुरुवात होणारी ही मोहीम जवळपास पाच महिने चालनार आहे. ज्ञान भारती ऍग्रो टुरिझम येथे झालेल्या बैठकीत मोहिमेतील प्रत्येक दिवसाचे नियोजन करण्यात आले. सहसी पर्वत रांगा पार करताना येणारे अडथळे, सोबत न्यावे लागणारे साहित्य, जीवनावश्यक वस्तू गरम कपडे, यासह महिलांनी काय विशेष काळजी घेतली पाहिजे यावर चर्चा आणि मंथन करण्यात आले.
या दहा जणींचा आहे सहभाग
बचेंद्री पाल यांच्या नेतृत्वात ही मोहीम राबवली जाणार आहे. यात वेस्ट बंगाल कलकत्ताच्या चेतना साहू , भिलाई छत्तीसगडच्या सविता धपवाल (52), कर्नाटक मयसूरच्या श्यामला पद्मनाभन (64),बरोदा गुजरातच्या गंगोत्री सोनेज, पालनपूर गुजरातच्या चौला जागीरदार, पायो मुरमु, डॉ. सुषमा बीसा, क्रिष्णा दुबे हे या मोहिमेत सहभागी होणार आहे.