बेंगळुरू : कर्नाटक विधानसभेचे अध्यक्ष यूटी कादर यांनी बुधवारी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) 10 आमदारांना विधानसभेच्या उर्वरित अधिवेशनासाठी निलंबित केले आहे. आमदारांनी सभागृहात असभ्य वर्तन केल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. त्याचवेळी, विरोधी पक्ष भाजप आणि जेडी (एस) यांनी कर्नाटक विधानसभा अध्यक्ष यूटी कादर यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावाची नोटीस विधानसभा सचिवांना दिली आहे.
'या' आमदारांवर निलंबनाची कारवाई : विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केलेल्या भाजपच्या 10 आमदारांमध्ये डॉ. सी. एन. अश्वथ नारायण, व्ही. सुनील कुमार, आर. अशोक, अराग ज्ञानेंद्र (सर्व माजी मंत्री), डी. वेदव्यास कामथ, यशपाल सुवर्णा, धीरज मुनिराज, ए. उमानाथ कोटियन, अरविंद बैलाड, वाय भरत शेट्टी यांचा समावेश आहे. विधानसभेचे अधिवेशन 3 जुलैपासून सुरू झाले असून ते 21 जुलै रोजी संपणार आहे.
विधानसभेच्या उर्वरित सत्रासाठी निलंबित : सभागृहात गदारोळ झाल्यानंतर सभापतींनी ही कारवाई केली. कादर यांनी जेवणाच्या विश्रांतीशिवाय सभागृहाचे कामकाज चालविण्याच्या निर्णयावर नाराज झाल्याने भाजपच्या काही सदस्यांनी विधेयकाच्या प्रती फाडल्या. आमदारांनी प्रती थेट सभापतींच्या व्यासपीठावर फेकल्या. त्यामुळे एकच गदारोळ झाला. आमदारांच्या असभ्य वर्तनामुळे 'मी' 10 आमदारांची नावे घेत असल्याचे सभापती म्हणाले. यानंतर विधी, संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील यांनी आमदारांवर कारवाई करण्यात येईल असे सांगितले. त्यानंतर त्यांनी निलंबनाचा प्रस्ताव मांडला. कर्नाटक विधानसभेच्या नियमावलीच्या कलम ३४८ अन्वये या सदस्यांना त्यांच्या असभ्य वर्तनासाठी विधानसभेच्या उर्वरित सत्रासाठी निलंबित करण्यात आल्याचे पाटील म्हणाले.
-
#WATCH | Bengaluru, Karnataka: BJP MLAs create ruckus in the Karnataka Assembly; shouting against State Government's decision to depute IAS officers for an opposition party meeting held in Bengaluru
— ANI (@ANI) July 19, 2023 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
(Video source: Karnataka Assembly) pic.twitter.com/ABRSTkf6OL
">#WATCH | Bengaluru, Karnataka: BJP MLAs create ruckus in the Karnataka Assembly; shouting against State Government's decision to depute IAS officers for an opposition party meeting held in Bengaluru
— ANI (@ANI) July 19, 2023
(Video source: Karnataka Assembly) pic.twitter.com/ABRSTkf6OL#WATCH | Bengaluru, Karnataka: BJP MLAs create ruckus in the Karnataka Assembly; shouting against State Government's decision to depute IAS officers for an opposition party meeting held in Bengaluru
— ANI (@ANI) July 19, 2023
(Video source: Karnataka Assembly) pic.twitter.com/ABRSTkf6OL
लोकशाहीची हत्या : कर्नाटक विधानसभेतील भाजपच्या 10 आमदारांच्या निलंबनावर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले की, हा लोकशाहीसाठी काळा दिवस आहे. आज लोकशाहीची हत्या झाली आहे. भाजपचे 10 आमदार निलंबित करण्यात आले आहेत. निलंबित आमदारांच्या हक्कासाठी आम्ही लढणार आहोत. यावरून काँग्रेस सरकारची हुकूमशाही दिसून येते, त्यांनी आमच्या 10 आमदारांना विनाकारण निलंबित केले आहे. आम्ही सभापतींच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव आणला आहे. हा लढा आम्ही जनतेपर्यंत नेऊ असे माजी मुख्यमंत्री बोम्मई म्हणाले.