महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / snippets

पोलिसांची तत्परता, महिलेसाठी एक पिशवी रक्त हेलिकॉप्टरने पोहचवले

Etv Bharat
Etv Bharat (Etv Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 11, 2024, 8:26 PM IST

गडचिरोली : अतिवृष्टीमुळे तीन दिवसांपासून भामरागडचा संपर्क तुटलेला आहे. 8 सप्टेंबरला पुरातून वाट काढत एका महिलेची वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्रसुती केली होती. मात्र, त्या मातेला एक पिशवी रक्त चढवल्यानंतर आणखी एक पिशवी रक्ताची गरज भासली. पुरामुळे सगळ्या वाटा अडलेल्या होत्या. पावसाने विश्रांती घेतल्यानंतर आज सकाळी हेलिकॉप्टरने रक्ताची पिशवी पोहोचवण्यात आली. मंतोशी गजेंद्र चौधरी असं महिलेचं नाव आहे. मंतोशीचा B-ve हा रक्तगट आहे. एकीकडे पूर तर दुसरीकडे खराब हवामानामुळे हेलिकॉप्टरने रक्तपिशवी पोहाेचविण्यास अडचण येत होती. आज आकाश निरभ्र होताच गडचिरोलीतून एक पिशवी रक्त घेऊन आरोग्य कर्मचारी भामरागडला रवाना झाले. यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी जिल्हा पोलीस दलाचं हेलिकॉप्टर विनाविलंब उपलब्ध करुन दिलं.

ABOUT THE AUTHOR

...view details