महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

अकोले तालुक्यात जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा; पाहा व्हिडिओ - World Tribal Day 2024 - WORLD TRIBAL DAY 2024

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 9, 2024, 9:10 PM IST

अकोले Tribal Day Celebration In Akole : अकोले तालुक्यात जागतिक आदिवासी दिन आज (9 ऑगस्ट) मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. अकोले हा आदिवासी बहुल तालुका असल्यानं येथे सर्वच राजकीय पक्षांच्या वतीनं अदिवासी दिन ढोल ताशाच्या गजरात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अदिवासी युवा नेते अमित भांगरे यांनी लाडू वाटप करत, तसंच भव्य रॅलीचं आयोजन करत अदिवासी दिन साजरा केला. यावेळी पारंपरिक वेशभूषेत आदिवासी बांधवांनी काबड नृत्य केलं. दरम्यान, आधुनिक काळात जगभरातील आदिवासी संस्कृती आणि सभ्यता अधिक बळकट व्हावी, त्याचं योग्य जतन व्हावं यासाठी 9 ऑगस्ट रोजी संयुक्त राष्ट्रसंघानं 'जागतिक आदिवासी दिवस' घोषित केला होता. गेली 42 वर्षांपासून आदिवासी दिन जगभरात साजरा होत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details