रियल जीवनातील हिरो कसा असावा? श्रद्धा कपूरनंच सांगितलं; पाहा व्हिडिओ - Shraddha Kapoor - SHRADDHA KAPOOR
Published : Oct 5, 2024, 10:58 PM IST
शिर्डी : विधानसभेच्या तोडावर विखे पाटलांनी जनसेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून 'शिर्डी महोत्सवाचं' आयोजन केलं होतं. यातील 'नारी शक्ती सन्मान सोहळ्यात' बॉलीवुडची अभिनेत्री श्रद्धा कपूरला आमंत्रित करण्यात आलं होतं. यावेळी श्रद्धाच्याहस्ते दहा यशस्वी महिलांचा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात तुमचा जीवनातील हिरो कसा असावा? असा प्रश्न श्रद्धा कपूरला विचारण्यात आला होता. यावर श्रध्दा कपूर म्हणाली मस्त फिरवणारा, जिभेचे चोचले पुरवणारा असं श्रध्दा कपूरनं उत्तर दिलं आहे.
विधानसभेला मत पेरणी करण्यासाठी विखे पाटलांनी आता लाडक्या बहीणींसाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन सुरु केलंय. यात शुक्रवारी अभिनेत्री श्रद्धा कपूरला साईदर्शन घडवत विविध क्षेत्रातील यशस्वी आणि कतृत्वान महिलांचा नारी शक्तींचा सन्मान सोहळा साजरा केलाय. यावेळी श्रद्धा कपूरने मराठीच बोलत आपण कॉकटेल असल्याचं सांगितलं. आर्धी मराठी आणि आर्धी पंजाबी असली तरी श्रद्धानं उत्तम मराठीच संवाद साधत सर्वांची मने जिंकली.