महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

हजारो दिव्यांनी लखलखली साईंची शिर्डी, रामभक्तांचा एकच जल्लोष - राममंदिर प्राणप्रतिष्ठा

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 22, 2024, 10:41 PM IST

शिर्डी (अहमदनगर) Ram Mandir Pran Pratishtha : अयोध्यात प्रभू श्रीराम यांच्या आगमनानंतर देशभरात मोठा जल्लोष साजरा केला जातोय. साईबाबांच्या शिर्डीतही ग्रामस्थांनसह भाविकांनी द्वारकामाई समोर 11 हजार दिवे प्रज्वलित केलेय. (Ram Utsav in Shirdi) भाविकांनासह ग्रामस्थांनी लावलेल्या दिव्यांनी साईंचा द्वारकामाई परिसर लखलखून गेलाय. (Arras of Lights in Shirdi)

घोषणांनी द्वारकामाई परिसर दुमदुमला: 'सबका मालिक एक'चा महामंत्र देणाऱ्या शिर्डी साईबाबांनी ज्या द्वारकामाईत प्रभू श्रीराम जन्म उत्सव साजरा केला. त्याच द्वारकामाई समोरील प्रांगणात शिर्डी ग्रामस्थांसह भाविकांनी आज सायंकाळी "धनुष्यबाण जय श्रीराम" प्रतिकृती साकारत 11 हजार दिवे प्रज्वलित केले. (Ayodhya Ram Mandir) साईबाबांच्या द्वारकामाईत समोरील प्रांगणात लावलेला दिव्यांनी परिसर लखलखून गेलाय. यावेळी भाविकांसह ग्रामस्थांनी "जय श्रीराम, जय साईराम"च्या केलेल्या जयघोषाने द्वारकामाई परिसर दुमदुमून गेलाय.

श्रीराम, साईबाबांची सुवर्ण रथातून शोभायात्रा: अयोध्येत राममंदिर लोकार्पण सोहळ्याचा पार्श्वभूमीवर शिर्डीमध्ये आज भगवान श्रीराम आणि साईबाबांची प्रतिमा सुवर्णरथात विराजमान करून भव्य शोभायात्रा काढण्यात आली होती. ज्यामध्ये वाद्यांच्या तालावर भक्तांनी नृत्याचा ठेका धरला. हा उत्सव बघण्यासाठी हजारो भाविक शिर्डीत दाखल झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details