मानाचा तिसरा गुरुजी तालीमच्या मिरवणुकीत काय आहे खास? पहा व्हिडिओ - pune ganpati visarjan
Published : Sep 17, 2024, 12:08 PM IST
पुणे- Pune Ganpati Visarjan मानाचा तिसरा गुरुजी तालीम यांनी प्रथेप्रमाणे पर्यावरण पूरक मुक्त गुलालाची उधळण करण्यात येणार आहे. पुण्यात गुरुजी तालीम गणपती हा मानाचा तिसरा गणपती आहे. गुरुजी तालीम गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होत आहे. मिरवणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. मिरवणुकीसाठी सुर्यरथाचा देखावा उभारण्यात आला आहे. मंडळाचे उत्सव प्रमुख हार्दिक परदेशी म्हणाले, " यंदा मंडळाचे १३८ वे वर्ष आहे. विसर्जन मिरवणुकीमध्ये कार्यकर्त्यांचा मोठा उत्साह आहे. पहिला कसबा गणपती दुसरा तांबडी जोगेश्वरी आणि तिसरा गुरुजी तालीम अशा पद्धतीचा क्रमवार ठरवून मिरवणुकीला सुरुवात होत असते. यंदा फुलांचा सूर्यरथ तयार करून मिरवणुकीसाठी खास आकर्षण तयार करण्यात आले आहे. यंदा ढोल ताशा पथकासह शिखंडी हे तृतीयपंथी यांचे विशेष ढोल पथक आकर्षण ठरणार आहे. पर्यावरण पूरक गुलालाची मुक्त उधळण यासाठी मंडळ प्रसिद्ध आहे. यासाठी हजारो तरुण प्रामुख्याने उपस्थिती दर्शवून बाप्पाला निरोप देत असतात."