महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

राज ठाकरेंचं श्वानप्रेम पुन्हा आलं समोर, भटक्या कुत्र्यांची थेट पदाधिकाऱ्यांवरद दिली जबाबदारी! - Raj thackeray - RAJ THACKERAY

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 9, 2024, 10:12 PM IST

मुंबई- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच श्वानप्रेम जगजाहीर आहे. त्यांच्या घरात काही प्रजातीचे कुत्रे आहेत. रस्त्यावर एखादा भटका कुत्रा दिसला तरी राज ठाकरे त्याला बिस्किट खाऊ घालतात. दरम्यान त्यांचा असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. राज ठाकरे हे आपल्या ताफ्यासोबत गाडीनं जात असताना त्यांना रस्त्यावर श्वानाची तीन पिल्ले दिसली.  त्यावेळी राज ठाकरे यांनी आपली गाडी अचानक थांबविली. त्यानंतर ते स्वतः गाडीतून उतरतात.  त्या पिल्लांना जवळ घेतात. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांना जवळ बोलावून पिल्लांना सांभाळण्याची जबाबदारी दिली.  पदाधिकाऱ्यांना श्वानाच्या पिल्लाबाबत काय नाव ठेवावं असं विचारलं. त्यावर लगेचच राज यांनी अमर, अकबर, अँथनी असं नाव सूचवतात. राज ठाकरे यांचं श्वानप्रेम या व्हिडिओमधून दिसून आलं आहं. 

ABOUT THE AUTHOR

...view details