महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

मनोज जरांगे पाटील हजारोंच्या ताफ्यात नवी मुंबईत दाखल; एपीएमसी मार्केटमध्ये शेवटचा मुक्काम - एपीएमसी मार्केट

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 26, 2024, 7:52 AM IST

नवी मुंबई Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा आंदोलकांनी गुरुवारी (25 जानेवारी) मुंबईच्या दिशेने कूच केली आहे. रात्री उशिरा आंदोलकांसह मनोज जरांगे पाटील नवी मुंबईमध्ये दाखल झाले आहेत.  ते मुंबईच्या सीमेवरील नवी मुंबईमधील एपीएमसी मार्केटमध्ये शेवटच्या मुक्कामी होते. यासाठी बाजार समिती प्रशासनानं पाचही मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. तर नवी मुंबई शहरात सकल मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जरांगे पाटील आणि दाखल झालेल्या आंदोलकांसाठी भोजनाची आणि राहण्याची व्यवस्था केली होती. त्याचप्रमाणे महानगरपालिकेची मैदानं, सिडको प्रदर्शन केंद्र आणि इतर ठिकाणीही सोय करण्यात आली होती. तसंच नवी मुंबई महापालिकेच्या वतीनं पाण्याचे टँकर आणि टॉयलेटची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. 

ABOUT THE AUTHOR

...view details