महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

शरद पवारांच नाव घेतल्याशिवाय देशातील राजकारण पूर्णच होत नाही - जितेंद्र आव्हाड - जितेंद्र आव्हाड

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 23, 2024, 10:49 PM IST

मुंबई Jitendra Awhad News : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर निवडणूक आयोगानं शरद पवार गटाला नवं नाव आणि पक्ष चिन्ह दिलं. शरद पवार गटाला 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार' असं नाव केंद्रीय निवडणूक आयोगाकडून देण्यात आलं. त्यानंतर आता शरद पवार गटाला 'तुतारीवाला माणूस' हे चिन्ह निवडणूक आयोगानं बहाल केलंय. मात्र, या चिन्हावरुन सत्ताधारी पक्षातील नेते टीका करत असल्याचं पहायला मिळतंय. याच टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उत्तर दिलंय. या संदर्भात माध्यमांशी संवाद साधत असताना जितेंद्र आव्हाड म्हणाले की,"राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते राज्यसभा निवडणूकीवेळी आमच्याकडं येणार, अशा प्रकारच्या अफवा लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पसरवली जात आहे. शरद पवार आमचे सर्वोच्च नेते असून त्यांचं नाव घेतल्याशिवाय देशातील राजकारण पूर्ण होतच नाही", असं ते म्हणाले. तसंच पक्ष वाढवण्यासाठी तुमची ताकद नाही का? आमचे नेते कशाला हवे? असं म्हणत प्रदेशाध्यक्ष (शरद पवार गट) जयंत पाटील यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांवरूनदेखील त्यांनी टोला लगावला.

ABOUT THE AUTHOR

...view details