महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / videos

फिल्मी स्टाईल चोरी; बंदुकीचा धाक दाखवत दरोडेखोरांनी भरदिवसा लुटलं सोनं - SANGAMNER GOLD SHOP ROBBERY

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 11, 2024, 8:22 PM IST

Updated : Nov 11, 2024, 10:13 PM IST

संगमनेर : संगमनेर तालुक्यातील साकूर येथं भरदिवसा गर्दीच्या ठिकाणी पाच दरोडेखोरांनी सोन्याच्या दुकानात दरोडा टाकल्याची घटना समोर आली आहे. निखिल सुभाष लोळगे यांचं संगमनेर तालुक्यातील साकूर येथील बसस्थानकाजवळ कान्हा नावाचं सोन्याचं दुकान आहे. पाच दरोडेखोरांनी दुचाकीवरून येत या दुकानात प्रवेश केला. तसंच दुकानासमोर हवेत गोळीबार केला. सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम घेऊन हे दरोडेखोर पसार झाले. पाचही दरोडेखोरांनी तोंडाला कापड बांधलं होतं. दरोडेखोर गंठण, चैन, मंगळसूत्र, वाट्या, मिनी गंठण, टॉप्स, बेबी आदी सोन्याचा ऐवज घेऊन फरार झाले. ही घटना समजताच घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. घारगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दरोडेखोरांना शोधण्याचं काम सुरू आहे. या फिल्मी स्टाईल चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. 

Last Updated : Nov 11, 2024, 10:13 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details