मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दीर्घायुष्याकरिता खा. सदाशिव लोखंडे यांचे साईचरणी साकडे; पाहा व्हिडिओ - सदाशिव लोखंडे
Published : Feb 9, 2024, 10:57 PM IST
शिर्डी Eknath Shinde Birthday : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज (9 फेब्रुवारी) वाढदिवस आहे. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त शिर्डी लोकसभेचे खासदार सदाशिव लोखंडे आणि शिवसेनेच्या (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी आज साई बाबा समाधीचे दर्शन घेऊन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निरोगी आणि दीर्घ आयुष्य लाभो, तसंच येणाऱ्या काळात पुन्हा एकदा राज्याचे मुख्यमंत्री म्हणून शिंदे यांना नेतृत्व करण्याची संधी मिळावी. याकरिता शिर्डी साईबाबा चरणी या सर्वांनी साकडं घालत सदिच्छा व्यक्त केली आहे. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख कमलाकर कोते, संपर्क प्रमुख बाळासाहेब पवार, जिल्हा संघटक विठ्ठल घोरपडे, भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन कापसे, प्रशांत लोखंडे, युवासेना जिल्हा प्रमुख शुभम वाघ आदींसह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते.