महाराष्ट्र

maharashtra

पेट्रोल पंपावर हृदयविकाराचा झटक्याने शिक्षकाचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीत कैद - teacher heart attack death

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 28, 2024, 10:13 AM IST

Updated : Jul 28, 2024, 10:19 AM IST

हार्ट अटॅक (ETV Bharat Reporter)

बीड Beed Teacher Death : बदलत्या जीवशैलीमुळे हृदयविकाराच्या घटनेमध्ये वाढ झाली आहे. अशीच एक घटना बीड शहरात घडली आहे. नगर रोडवर असलेल्या पोलीस पेट्रोल पंपावर बाबासाहेब मिसाळ पेट्रोल भरण्यासाठी रांगेत उभे होते. अचानक ते खाली कोसळले. हृदयविकाराचा तीव्र झटक्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू  झाला. त्यांना वाचविण्याकरिता पेट्रोल पंपावरील चालकाने प्राथमिक उपचार केले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली. सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. बाबासाहेब मिसाळ हे बीडच्या वारोळा या आश्रम शाळेत कर्तव्यावर होते. घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी मिसाळ यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल पंपावरील काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांनी रुग्णवाहिका बोलावली. त्यांना हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. तपास करत असताना डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. 

Last Updated : Jul 28, 2024, 10:19 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details