मी काँग्रेसचा हिरो, मी काँग्रेसमध्येच राहणार - आमदार रवींद्र धंगेकर
Published : Feb 12, 2024, 11:02 PM IST
पुणे : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचं प्राथमिक सदस्यत्व आणि आमदारकीचा राजीनामा दिलाय. त्यामुळं काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे. अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेसचे 15 ते 16 आमदार हे राजीनामा देऊन भाजपामध्ये जाणार आहे, अशी चर्चा सुरू आहे. अनेक काँग्रसचे आमदार हे भाजपाच्या संपर्कात आहेत, अशी चर्चा सुरू आहे. पुण्यातील कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आपली भूमिका स्पष्ट करत काँग्रेसमध्येच राहणार असल्याचं म्हटलं आहे. मी काँग्रेसचा हिरो असून मी काँग्रेस पक्ष सोडणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. चव्हाणांनी राजीनामा का दिला हा माझ्यासमोर मोठा प्रश्न आहे. त्यांची भूमिका अद्यापही स्पष्ट झालेली नाही, असंही आमदार धंगेकर म्हणाले.