हैदराबाद Breast cancer : जगभरातील स्त्रियांमध्ये स्तनाचा कर्करोग हा सर्वात जास्त प्रमाणात आढळणारा आजार आहे. या आजारामुळं होणाऱ्या मृत्यूचं प्रमाण चिंताजनक आहे. जागतिक वैज्ञानिक या रोगाच्या कारणांचा अभ्यास करत आहे. तसंच कर्करोगाला कारणीभूत असलेल्या पर्यावरणीय, अनुवांशिक जीवनशैली घटकांवर लक्ष केंद्रित करत आहे. भारतात, अलिकडच्या वर्षांत गर्भाशयाच्या कर्करोगाला मागं टाकत, स्तनाचा कर्करोगानं थौमान घातलं आहे. वैज्ञानिक कारणांचं सखोल आकलन, अचूक डेटासह, उत्तम प्रतिबंध उपचारांमुळं या आजारावर मात मार्ग काढता येऊ शकतो.
2.3 दशलक्ष स्तनाचा कर्करोग :महिलांना जागतिक स्तरावर, स्तनाचा कर्करोग दरवर्षी 2.3 दशलक्ष पेक्षा जास्त स्त्रियांना प्रभावित करतोय. सर्व नवीन कर्करोगाच्या प्रकरणांपैकी जवळजवळ 11.7% प्रकरणं स्तनाच्या कर्करोगाशी संबंधित आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) च्या मते, 2021 पर्यंत दरवर्षी 6 लाख 85 हजार नागरिकांच्या मृत्यूला कर्करोग जबाबदार आहे. युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम आणि ऑस्ट्रेलिया सारख्या विकसित देशांमध्ये या आजाराचं प्रमाण अधिक आहे. आफ्रिका आणि आशियाच्या काही भागांमध्ये कर्करोगाचा दर कमी असल्याचं दिसून आलं आहे. विकसनशील राष्ट्रांमध्ये वाढत्या कर्करोग रुग्णांची संख्या त्रासदायक होत आहे. शहरीकरण आणि पाश्चात्य जीवनशैलीचा अवलंब केल्यामुळं या आजाराला खतपाणी मिळतंय. 2024 पर्यंत स्तनाच्या कर्करोगाची प्रकरणे 2.5 दशलक्षाही ओलांडण्याची शक्यता आहे.
'स्त्रियांच्या जीवनशैलीमध्ये बदल होत आहेत. त्यामुळं स्तनाच्या कर्करोगाची वाढ होताना दिसून येतोय. हा कर्करोग 40 ते 50 वर्षे वयोगटातील महिलांमध्ये असल्याचं आढळून येत आहेत. जीन्स बाह्य वातावरणात होणारे बदल, अन्न, वातावरणातील प्रदूषण, बदलती जीवनशैली यासारखे अंतर्गत घटक कर्करोगाच्या वाढीची प्रमुख कारणं आहेत. - डॉ. समीर कौल, कर्करोग तज्ञ
काय आहे कर्करोगाची कारणं :स्तनाचा कर्करोग हा एक जटिल आजार आहे, ज्याच निश्चित कारण सांगता येत नाही. मात्र, वैज्ञानिक संशोधनातून काही तत्थ समोर आली आहे. कर्करोगाला अनुवांशिक, हार्मोनल, पर्यावरणीय आणि जीवनशैली घटक जबाबदार असल्याचं WHO संघटनेचं म्हणणं आहे.
आनुवंशिकता :स्तनाच्या कर्करोगासाठी सर्वात जोखीम घटकांपैकी एक म्हणजे अनुवांशिक घटक होय. BRCA1 आणि BRCA2 जनुकांमधील उत्परिवर्तनमुळं कर्करोगाचा धोका 65-85% पर्यंत वाढतोय. स्तनाच्या कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या स्त्रियांनाही हा आजार होण्याची शक्यता जास्त असते. मासिक पाळी, स्त्रियांना 30 वर्षांनंतर मूल झालेलं मूल देखील कर्करोगाला आमंत्रण देऊ शकतो.
जीवनशैली :लठ्ठपणा आणि मद्यपान यांचा स्तनाच्या कर्करोगाशी संबंध आहे. विशेषतः जगभरातील 30-40% कॅन्सरची प्रकरणे जीवनशैलीत बदल करून टाळता येऊ शकतात, असं WHO नं म्हटलं आहे. स्तनाचा कर्करोग हा धूम्रपान, खराब आहार, शारीरिक हालचालींचा अभाव या सर्व गोष्टी स्तनाच्या कर्करोगाची जोखम वाढवतात.
पर्यावरणीय घटक : किरणोत्सर्गाच्या संपर्कात आल्यास कर्करोगाधा धोका वाढतोय. विशेषत: यौवनकाळात जेव्हा स्तनाची ऊती अत्यंत संवेदनशील असते, तेव्हा किरणोत्सर्गामुळं स्तनाच्या कर्करोगा होण्याचा धोका असतो. काही अभ्यासांनी असंही सुचवलं, की कीटकनाशकं आणि प्लॅस्टिकमध्ये आढळणारी काही रसायनं, अंतःस्रावी-विघटनकारी संयुगे यांचा संपर्क स्तनाच्या कर्करोगाच्या वाढीला जबाबदार आहे.
"फूड पॅकेजिंगमध्ये स्तनाच्या कर्करोगाशी संबंधित 200 रसायनं आढळून आलीय. स्टिक, कागद तसंच स्ट्रॉसह खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगमध्ये जवळपास 200 संभाव्य स्तन कर्करोगाची रसायने ओळखण्यात संशोधकांना यश आलं आहे. फ्रंटियर्स इन टॉक्सिकोलॉजीमध्ये मंगळवारी प्रकाशित झालेल्या निष्कर्षात अन्न उत्पादनांमधील रसायने कमी करण्यासाठी मजबूत प्रतिबंधात्मक उपायांची करण्याची गरज" असल्याचं म्हटलं आहे. - फ्रंटियर्स इन टॉक्सिकोलॉजीमध्ये प्रकाशित संशोधन लेख