हैदराबाद : Xiaomi आज 9 डिसेंबर रोजी भारतात त्यांची मध्यम श्रेणीची मालिका लॉंच करणार आहे. या लाइनअपमध्ये, कंपनी Redmi Note 14, Redmi Note 14 Pro, आणि Redmi Note 14 Pro + सारखे स्मार्टफोन लॉंच करेल. आगामी मालिकेबद्दल अनेक तपशील आधीच समोर आले आहेत. दुपारपासून कंपनीच्या अधिकृत यूट्यूब चॅनेलवर त्यांचा थेट कार्यक्रम पाहता येईल. कंपनी या मालिकेत कोणती मजबूत वैशिष्ट्ये देणार आहे?, त्याची अपेक्षित किंमत काय आहे? जाणून घेऊया...
Amazon वर होणार विक्री :Redmi Note 14 मालिका लॉंच झाल्यानंतर Amazon वर विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाईल. यासाठी काही दिवसापूर्वी मायक्रोसाइटसुरू करण्यात आली होती. ही सीरीजची रचना चीनमील फोनसारखीच असेल. मात्र, त्यात काही किरकोळ बदल करण्यात येणार आहेत. कंपनी मार्बल फिनिशसह काळ्या आणि पांढऱ्या रंगात या मालिकेचे बेस मॉडेल आणत आहे. चीनमध्ये कंपनीने हा फोन निळ्या रंगातही आणला आहे, मात्र तो भारतात लॉंच होणार नाहीय.
Redmi Note 14 ची वैशिष्ट्ये : Amazon आणि Xiaomi India च्या वेबसाइटवर समोर आलेल्या तपशीलानुसार, Redmi Note 14 ला ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) सह 50MP Sony LYT-600 प्राइमरी कॅमेरा मिळेल. यात 2MP डेप्थ सेन्सर आणि 16MP सेल्फी शूटर असेल.
MediaTek Dimensity 7025 Ultra SoC प्रोसेसर :स्मार्टफोनमध्ये Xiaomi चा AI असिस्टंट AiMi एक व्हायब्रंट डिस्प्ले आणि उत्तम गोपनीयता पर्यायांसह मिळेल. हा कंपनीचा स्वतःचा AI असिस्टंट आहे. यात 120Hz रिफ्रेश रेट, 2,100 nits पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास संरक्षणासह 6.67-इंच फुल-एचडी + AMOLED स्क्रीन असेल. कामगिरीसाठी, फोनमध्ये MediaTek Dimensity 7025 Ultra SoC प्रोसेसर असू शकते. पाणी आणि धुळीपासून सुरक्षित ठेवण्यासाठी याला IP64 रेट केलंय. फोनला शक्तिशाली 5,110 mAh बॅटरी मिळणार आहे. हा फोन 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. यात Android 15-आधारित HyperOS 2.0 ऑपरेटिंग सिस्टम मिळेल.
अपेक्षित किंमत :रिपोर्ट्सनुसार 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजसह Redmi Note 14 5G चे बेस व्हेरिएंट 21 हजार 999 रुपयांपासून सुरू होऊ शकतं. 128GB आणि 256GB स्टोरेजसह 8GB रॅम मॉडेलची किंमत अनुक्रमे 22 हजार 999 आणि 24 हजार 999 रुपये असण्याची शक्यता आहे. या इव्हेंटमध्ये Redmi Buds 6 आणि Xiaomi साउंड आउटडोअर स्पीकर देखील लॉंच केले जातील.
हे वाचलंत का :
- TECNO Phantom V Fold 2 आणि Phantom V Flip 2 फोल्डेबल सीरीज लॉंच, काय आहे खास?
- सॅमसंग गॅलेक्सी ट्राय फोल्ड फोन 2026 मध्ये लॉंच होणार?, कसा असेल फोन जाणून घ्या..
- iQOO 13 प्री-बुकिंग सुरू, 3 हजारांच्या विशेष सवलतीसह मिळताय मोफत इयरबड्स