हैदराबाद : Realme 14 Pro 5G मालिका भारतात 16 जानेवारी म्हणजे आज Snapdragon 7s Gen 3 चिपसेटसह लाँच केली होणार आहे. या मालिकेत Realme 14 Pro आणि Realme 14 Pro + 5G फोन लॉंच होतील. लाँच होण्यापूर्वीच हे स्पेसिफिकेशन उघड झाले होते. कंपनी सतत स्मार्टफोन मालिकेबद्दल टीझ करत आहे. Realme 14 Pro + 5G फोन चीनमध्ये आधीच लाँच करण्यात आले आहे. ही मालिका 6,000mAh बॅटरीसह येईल.
Realme च्या नवीनतम टीझरमध्ये Relame 14 Pro 5G मालिकेत Snapdragon 7s Gen 3 चिपसेट मिळेल. तथापि, हे चिपसेट दोन्ही मॉडेलपैकी कोणत्या मॉडेलला मिळेल, हे कंपनीनं स्पष्ट केलेलं नाहीय. असं मानलं जातंय की Realme 14 Pro 5G मीडियाटेक डायमेन्सिटी 7300 एनर्जी SoC सह सादर केले जाईल. आगामी Realme मालिका फ्लिपकार्ट आणि Realme ई-स्टोअरद्वारे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली जाईल. लाँचच्या वेळी किंमत आणि उपलब्धतेची अचूक माहिती समोर येईल. हे फोन पर्ल व्हाइट आणि सुएड ग्रे रंगात आणि दोन खास शेड्समध्ये उपलब्ध असतील.
Realme 14 Pro 5G स्पेसिफिकेशन
अलीकडेच एका टिपस्टरनं मालिकेचं प्रमोशनल पोस्टर्स शेअर केलं होतं, ज्यामध्ये दोन्ही मॉडेल्सचे काही स्पेसिफिकेशन उघड झाले आहेत. Realme 14 Pro 5G मध्ये डायमेन्सिटी 7300 एनर्जी चिपसेट मिळण्याची अपेक्षा आहे. हा फोन 45W SuperVOOC चार्जिंगला सपोर्ट करेल. 14 Pro 5G मध्ये ऑप्टिकल इमेज स्टॅबिलायझेशन (OIS) आणि 4K व्हिडिओ रेकॉर्डिंगसह 50-मेगापिक्सेल सोनी IMX882 प्रायमरी रिअर सेन्सर मिळण्याची शक्यता आहे. समोर 16-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असेल.