हैदराबाद Prabhakar Raghavan : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी Google चे वरिष्ठ उपाध्यक्ष प्रभाकर राघवन यांच्या नावाची मुख्य तंत्रज्ञ म्हणून घोषणा केलीय. प्रभाकर राघवन यांच्याकडं गुगल सर्च, असिस्टंट, जिओ, ॲड्स, कॉमर्स आणि पेमेंट्स उत्पादनांचा पदभार आहे.
प्रभाकर राघवन गुगलचे मुख्य तंत्रज्ञ : Google सध्या मायक्रोसॉफ्ट, ओपनएआय सारख्या कंपन्याशी स्पर्धा करत आहे. ग्राहकांच्या वर्तनात सतत होणारे बदल देखील स्पर्धेला वाव देत आहेत. त्यामुळेच गुगलनं मुख्य तंत्रज्ञ म्हणून प्रभाकर राघवन यांच्या नावाची घोषणा केलीय. याबात पिचाई यांनी म्हटंलय की, “प्रभाकरन यांना स्वतःच्या कारकिर्दीत मोठी झेप घेण्याची वेळ आली आहे. ते 12 वर्षे Google मध्ये नेतृत्व करत आहेत. त्यामुळं त्यांची गुगलचे मुख्य तंत्रज्ञ म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे.” राघवन यांच्या नेतृत्वाखाली Google नॉलेज अँड इन्फॉर्मेशन (K&I) नवीन मॉडेल्स सक्षम करण्यास मदत होईल. तसंच गुगलच्या उत्कृष्ट उत्पादनाची गती वाढेल, असं पिचाई म्हणाले.