महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

OnePlus OxygenOS 15 अपडेट्स पुढील आठवड्यात होणार रिलीज

OnePlus OxygenOS15 Update : OnePlus स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. वनप्लसच्या अनेक स्मार्टफोन्ससाठी लवकरच नवीन अपडेट्स येत आहेत. याबाबत OnePlus नं घोषणा केलीय.

By ETV Bharat Tech Team

Published : 4 hours ago

OnePlus OxygenOS15 Update
OnePlus OxygenOS15 Update (OnePlus)

हैदराबाद OnePlus OxygenOS 15 Update : OnePlus कंपनीनं OxygenOS 15 सॉफ्टवेअर अपडेटची तारीख जाहीर केलीय हे अपडेट Android 15 सह येईल. OxygenOS 15 ऑपरेटिंग सिस्टम पूर्णपणे रीडिझाइन केल्याचं OnePlus नं सांगितलंय. या ऑपरेटिंग सिस्टममुळं वापरकर्त्याना चांगला अनुभव मिळेल असा कंपीचा दावा आहे. यासोबतच यामध्ये AI फीचर्सही उपलब्ध असतील.

OxygenOS 15 कधी लाँच होईल? : OnePlus कंपनीचे वापरकर्ते 24 ऑक्टोबर रोजी दुपारी 3.30 पासून नवीनतम OxygenOS 15 डाउनलोड करू शकतील. OnePlus ऑनलाइन इव्हेंटच्या माध्यामातून स्मार्टफोन ऑपरेटिंग सिस्टमचं OxygenOS 15 लॉंच करणार आहे . Android 15 वर आधारित OxygenOS 15 OnePlus च्या स्मार्ट फोनसाठी फायद्याची ठरणार असल्याचं कंपनीचं म्हणणे आहे. यात AI वैशिष्ट्ये तसंच उत्कृष्ट डिझाइन शैली असेल असं कंपनीनं सांगितलं.

अपडेटमध्ये काय आहे खास ? :कंपनीनं सांगितलं की, वापरकर्त्यांना जलद, चांगला अनुभव प्रदान करणं हा वनप्लसचा मुख्य उद्देश आहे. नवीन OxygenOS 15 मध्ये, OnePlus नं उद्योग अग्रणी सॉफ्टवेअर अल्गोरिदम तंत्रज्ञानाचा वापर केलाय. याशिवाय, OxygenOS 15 त्याच्या डिझाइनमध्ये OnePlus मनोरंजक फिचर देखील लॉंच करणार आहे.

OxygenOS 15 मिळणार नवीनतम AI वैशिष्ट्ये :याव्यतिरिक्त, OxygenOS 15 नं OnePlus ची नवीनतम AI वैशिष्ट्ये देखील सादर केली आहेत, ज्याचा उद्देश प्रगत तंत्रज्ञानासह वापरकर्त्यांना सक्षम करणं आहे. वापरकर्त्यांची उत्पादकता आणि सर्जनशीलता वाढवण्यासाठी हे फीचर्स खास तयार करण्यात आल्याचं कंपनीचं म्हणणं आहे. नवीन OxygenOS 15 अपडेटमध्ये स्पीड, परफॉर्मन्स आणि इंटेलिजेंसचा उत्तम कॉम्बिनेशन दिसेल, असं कंपनीनं म्हटलं आहे.

OxygenOS 15 अपडेट :

  • वनप्लस १२
  • OnePlus 12R
  • वनप्लस 11
  • OnePlus 11R
  • OnePlus 10 Pro
  • OnePlus 10T
  • OnePlus 10R
  • OnePlus Nord 3
  • OnePlus Nord CE 3
  • OnePlus Nord CE 3 Lite

OnePlus OxygenOS 15 ची वैशिष्ट्ये :

सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी सपोर्ट :अँड्रॉइड 15 अपडेटमध्ये सॅटेलाइट कनेक्टिव्हिटी सपोर्ट मिळणार आहे. हे फीचर मिळाल्यानंतर यूजर्स नेटवर्कशिवाय कॉल आणि मेसेज करू शकतील, मात्र कंपनीनं याबाबत कोणतेही अपडेट दिलेलं नाही.

स्क्रीन शेअरिंग :Google गोपनीयता सुधारण्यासाठी Android 15 मध्ये आंशिक स्क्रीन शेअरिंगचं वैशिष्ट्य सादर करण्याची शकता आहे. यामध्ये, संपूर्ण स्क्रीन शेअर करण्याऐवजी, वापरकर्ते विशिष्ट ॲपची स्क्रीन शेअर करू शकतील.

नोटिफिकेशन कूलडाउन :Android 15 अपडेटमध्ये नोटिफिकेशन कूलडाउन ऑफर केलं जाऊ शकतं.

हे वाचलंत का :

  1. प्रभाकर राघवन गुगलचे नवे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी
  2. EPFO ने खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले, नवा नियम जाणून घ्या अन्यथा...
  3. सॅमसंगची पहिली स्मार्ट रिंग भारतात लाँच, तुमच्या हेल्थची घेणार काळजी

ABOUT THE AUTHOR

...view details