महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / technology

इस्रो 4 डिसेंबर रोजी PSLV C59 प्रोबा 3 मिशन प्रक्षेपित करणार - PSLV C59 PROBA 3 MISSION

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (ISRO) PSLVC-59/Proba-3 मिशन 4 डिसेंबर रोजी दुपारी 4:06 वाजता श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून प्रक्षेपित करणार आहे.

PSLVC-59/Proba-3
PSLV C59 प्रोबा 3 मिशन (ISRO)

By ETV Bharat Tech Team

Published : Dec 3, 2024, 12:20 PM IST

श्रीहरिकोटा PSLV C59 Proba 3 mission : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) PSLVC-59/Proba-3 मिशन 4 श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून 4 डिसेंबर रोजी दुपारी 4:06 वाजता प्रक्षेपित करणार आहे. या मोहिमेअंतर्गत, ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण वाहन PSLVC-59 सुमारे 550 किलो वजनाच्या उपग्रहांना उच्च लंबवर्तुळाकार कक्षेत घेऊन जाईल.

प्रोबा-3 उपग्रहांना नेण्यासाठी सज्ज : Proba-3 मिशनची रचना ESA द्वारे "इन-ऑर्बिट प्रात्यक्षिक" (IOD) मिशन म्हणून केली गेली आहे. याबाबत X वर पोस्ट करत, ISRO नं माहिती दिलीय. “PSLVC-59/Proba-3 मिशन, PSLV चं 61 वं उड्डाण आणि PSLV-XL कॉन्फिगरेशन वापरून 26 वं उड्डाण, ESA च्या प्रोबा-3 उपग्रहांना उच्च लंबवर्तुळाकार कक्षेत नेण्यासाठी सज्ज आहे.” इस्रोनं या संदर्भात दिलेल्या एका निवेदनात म्हटलं आहे की, “उड्डाणाची अचूक प्रक्रिया दाखवणे हा या मोहिमेचा उद्देश आहे.”

दोन अंतराळयानांचा समावेश :या मोहिमेत दोन अंतराळयानांचा समावेश आहे. या मोहिमेमध्ये कोरोनाग्राफ स्पेसक्राफ्ट (CSC) आणि ऑकल्टर स्पेसक्राफ्ट (OSC) या दोन अंतराळयानांचा समावेश आहे, जे "स्टॅक केलेले कॉन्फिगरेशन" एकत्र प्रक्षेपित केले जातील.

PSLV म्हणजे काय : PSLV हे प्रक्षेपण वाहन आहे, जे उपग्रह आणि इतर विविध पेलोड्स अवकाशात वाहून नेण्यास मदत करतं. हे लॉंच व्हेइकल लिक्विड स्टेजनं सुसज्ज भारतातील पहिलं वाहन आहे. पहिलं PSLV ऑक्टोबर 1994 मध्ये यशस्वीरीत्या प्रक्षेपित करण्यात आलं होतं. इस्रोच्या मते, PSLVC-59 ला प्रक्षेपणाचे चार टप्पे असतील. प्रक्षेपण वाहनाद्वारे उचलले जाणारे एकूण वस्तुमान सुमारे 320 टन आहे. स्पेस ऑर्गनायझेशननं हे देखील हायलाइट केलं की हे प्रक्षेपण मिशन PSLV च्या "विश्वसनीय अचूकतेचं" आणि इतर एजन्सींच्या सहकार्याचं उदाहरण देइल. हे मिशन PSLV च्या विश्वसनीय अचूकतेचे आणि NSIL (NewSpace India Limited), ISRO आणि ESA च्या सहकार्याचे उदाहरण देते,” पोस्टमध्ये म्हटले आहे. PSLV चे शेवटचे प्रक्षेपण PSLV-C58 होतं. ज्यानं एक्सपोसॅट उपग्रह "1 जानेवारी 2024 रोजी कक्षेत" सोडला.

जगातील पहिले प्रिसिजन फॉर्मेशन फ्लाइट मिशन :ESA नं सांगितलं की, प्रोबा-3 हे जगातील पहिले प्रिसिजन फॉर्मेशन फ्लाइट मिशन आहे. ते सूर्याच्या वातावरणातील सर्वात बाहेरील आणि सर्वात उष्ण थर असलेल्या सौर कोरोनाचा अभ्यास करेल. हा उपग्रह, ज्याला (एक्स-रे पोलारिमीटर सॅटेलाइट) देखील म्हटलं जातं, हा ISRO चा देशातील पहिला समर्पित वैज्ञानिक उपग्रह आहे, जो खगोलीय स्त्रोतांपासून क्ष-किरण उत्सर्जनाच्या अंतराळ-आधारित ध्रुवीकरण मापनामध्ये संशोधन करेल.

हे वाचलंत का :

  1. SRO च्या GSAT N2 या उपग्रहाचं SpaceX नं केलं यशस्वी प्रक्षेपण, पहा व्हिडिओ
  2. IIT मद्रास आणि ISRO यांच्यात LV थर्मल व्यवस्थापनाचा अभ्यास करण्यासाठी करार
  3. इस्रोच्या PSLV-37 रॉकेटचा वरचा भाग पृथ्वीच्या वातावरणात परतला

ABOUT THE AUTHOR

...view details